लक्षणं दिसत नसलेले कोरोना रुग्ण घरच्याघरी उपचार करू शकतात?; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 02:06 PM2020-07-02T14:06:31+5:302020-07-02T14:07:07+5:30

CoronaVirus News Latest Updates : लक्षणं दिसत नसलेल्या कोरोना रुग्णांकडून संक्रमणचा धोकाही काही प्रमाणात असू शकतो. असं स्पष्ट करण्यात आले.

Home remedies for asymptomatic coronary artery disease valuable advice given by experts | लक्षणं दिसत नसलेले कोरोना रुग्ण घरच्याघरी उपचार करू शकतात?; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

लक्षणं दिसत नसलेले कोरोना रुग्ण घरच्याघरी उपचार करू शकतात?; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Next

कोरोना विषाणूंचा प्रसार जसजसा जगभरात वाढत आहे. तसतशी कोरोनाबाबत नवीन माहिती समोर येत आहे. कोरोना विषाणूंवर लस किंवा औषध शोधण्यासााठी सर्वच देशातील शास्रत्र प्रयत्न करत आहेत.  सुरूवातीला कोरोना रुग्णांमध्ये ताप, सर्दी, सुका खोकला अशी लक्षणं दिसून येत होती. त्यानंतर लक्षणं दिसत नसलेल्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले.  लक्षणं दिसत नसलेल्या कोरोना रुग्णांकडून संक्रमणचा धोकाही काही प्रमाणात असू शकतो. असं स्पष्ट करण्यात आले.

भारतात कोरोना रुग्णांची संख्या पाच लाखांपर्यंत पोहोचली आहे. लक्षण दिसत नसलेल्या ज्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या रुग्णांना घरी सुद्धा उपचार घेता येऊ शकतात. तज्ज्ञांनी दिलेल्या गाईडलाईन्स नुसार घरच्याघरी कोरोनाचे उपचार केल्यास संक्रमणापासून लांब राहता येऊ शकतं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी काल सांगितले की लक्षण नसलेल्या रुग्णांनी घरून उपचार घेणं फायदेशीर ठरेल. यामुळे आरोग्य व्यवस्था आणि रुग्णालयांवर येणारा ताण कमी होईल.

येडियुरप्पा यांनी राज्यातील कोरोनाच्या व्यवस्थापनाबाबात वैद्यकीय तज्ज्ञांची बैठक आयोजित केली होती. राज्यातील कोविडच्या उपचार व व्यवस्थापनासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे आणि त्यावरील अंमलबजावणी यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. सरकारकडून लवकरच मार्गदर्शक सुचना देण्यात येणार आहेत.

येडियुरप्पांनी सांगितले, "अनेक तज्ज्ञांचे मत आहे की कोरोना विषाणूंची लक्षणं दिसत नसलेल्या रूग्णांवर घरी उपचार करणं योग्य ठरेल, परिणामी रुग्णालयांवरचा भार कमी होईल'' गंभीर अवस्थेत आणि आधीच इतर कोणत्याही आजार असलेल्या रूग्णांच्या उपचाराकडे लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला होता. 

या बैठकीला मनिपाल हॉस्पिटलचे डॉ. सुदर्शन बल्लाळ, स्पार्स हॉस्पिटलचे डॉ. शरण पाटील, फोर्टिस हॉस्पिटलचे डॉ. विवेक जावळी आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशनचे डॉ. गिरधर बाबू यांच्यासह इतर उपस्थित होते. लक्षणं दिसत नसल्यास रुग्णांचे निरीक्षणाखाली घरी उपचार केले जाऊ शकतात. याशिवाय डॉक्टरांनी दिलेल्या गाईडलाईन्सचे पालन केले तसंच योग्य पद्धतीने आहार घेतल्यास कोरोनातून बाहेर येण्यास रुग्णास मदत होऊ शकते.

Coronavirus : ना 14 ना 15, 'इतके' दिवस शरीरात राहू शकतं कोरोना व्हायरसचं संक्रमण

कोरोना विषाणूंमुळे मेंदूवर होतोय तीव्र परिणाम; 'या' आजारांच्या जाळ्यात अडकत आहेत लोक

Web Title: Home remedies for asymptomatic coronary artery disease valuable advice given by experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.