दिवाळीत फराळ करताना, फटाके वाजवताना भाजलं तर परिणाम गंभीर होण्याआधी करा 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 04:23 PM2021-11-02T16:23:32+5:302021-11-02T16:26:03+5:30

स्वयंपाकघरात फराळ तयार करताना उकळते पाणी किंवा तेल अंगावर पडून भाजण्याचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी दवाखान्यात जाण्याअगोदर काहीतरी घरगुती उपाय करणे आवश्यक असते. चला तर मग जाणून घेऊयात भाजल्यानंतर तुम्ही काय उपाययोजना करु शकता.

home remedies for burning | दिवाळीत फराळ करताना, फटाके वाजवताना भाजलं तर परिणाम गंभीर होण्याआधी करा 'हे' उपाय

दिवाळीत फराळ करताना, फटाके वाजवताना भाजलं तर परिणाम गंभीर होण्याआधी करा 'हे' उपाय

googlenewsNext

प्रत्येकाच्या घरात आता दिवाळीची गडबड सुरु असते.या गोंधळामध्ये घरातली छोटी-मोठी कामे करताना बऱ्याचदा चटका बसतो किंवा भाजते. विशेषत: स्वयंपाकघरात फराळ तयार करताना उकळते पाणी किंवा तेल अंगावर पडून भाजण्याचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी दवाखान्यात जाण्याअगोदर काहीतरी घरगुती उपाय करणे आवश्यक असते. चला तर मग जाणून घेऊयात भाजल्यानंतर तुम्ही काय उपाययोजना करु शकता.

कोरफड -
भाजलेल्या ठिकाणी कोरफड लावल्यामुळे भाजलेल्या जागेला मऊपणा येऊन लवकर बरे वाटते. म्हणून भाजलेल्या जागेवर कोरफडीचा गर लावावा. कोरफडीचा मऊपणा आणणारा व त्वचा पूर्ववत करणारा गुणधर्म भाजलेल्या जागी थंडावा मिळण्यास मदत करतो. कोरफडीचा गर जखमेवर चिकटून राहत नाही, त्यामुळे कोरफडीचा ताजा गर जखमेवर ठेऊन बांधावा. कोरफडीच्या ताज्या गरामुळे भाजलेली वेदनादायी जखम लवकर बरी होते व भाजल्याचे डागही राहत नाहीत.

मध -
सर्वांच्याच घरात उपलब्ध असणारी गोष्ट म्हणजे मध. मधेचा आयुर्वेदामध्ये विषेश महत्त्व प्रप्त आहे. खोकला असल्यास मधाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.भाजल्यावर प्रथमोपचार म्हणून मध लावतात,.मध लावल्यामुळे जखम लवकर बरी होऊन डाग पडण्याची शक्यता कमी होते. मध उत्तम अँटि-सेप्टिक असल्याने जखम लवकर भरून येण्यास मदत होते.

सौम्य लव्हेंडर ऑइल -
वेदना कमी करण्यासाठी हेही अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. सौम्य लव्हेंडर ऑइलमध्ये कोरफडीचा गर मिसळून भाजलेल्या ठिकाणी लावावा. कोरफडीच्या गरातील 'व्हिटॅमिन सी' आणि लव्हेंडर ऑइलमधील 'व्हिटॅमिन इ' एकत्र आल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. हे मिश्रण जखमेवर दिवसभर लावून ठेवावे.

केळ्याची साल -
केळ हे फळ १२ महिने सर्वत्र उपलब्ध असते. केळ्याची साल पूर्णपणे काळी होईपर्यंत भाजलेल्या ठिकाणी ठेवावी. जखम थंड होऊन लवकर बरी होण्यास मदत होते. भाजलेल्या जखमा बऱ्या करण्यास केळ्याची साल उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.

दही -
दही देखील आपल्याला सर्रस उपलब्ध होतो. प्रत्येक घरामध्ये हे असतेच. भाजल्यानंतर साधारणत: अर्ध्या तासानंतर जखमेवर दही लावावे. दह्यामुळे जखम थंड पडण्यास मदत होते.

ऑलिव्ह ऑइल -
जर तुमच्या घरामध्ये ऑलिव्ह ऑइल असल्यास भाजलेल्या जखमवेर ऑलिव्ह ऑइल लावल्यासही आराम मिळतो. थोडेफार भाजले असल्यास घरगुती उपचार करावेत. परंतु जास्त भाजल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: home remedies for burning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.