पोट साफ होत नाही? या घरगुती उपायांनी मिळवा काही मिनिटात आराम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 11:17 AM2018-05-02T11:17:14+5:302018-05-02T11:20:51+5:30

खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा यांमुळे बद्धकोष्ठ्ता जडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य वेळी  बद्धकोष्ठ्तेवर उपचार केले नाहीत, तर यातून गंभीर आजार संभवू शकतात.

Home remedies on constipation | पोट साफ होत नाही? या घरगुती उपायांनी मिळवा काही मिनिटात आराम

पोट साफ होत नाही? या घरगुती उपायांनी मिळवा काही मिनिटात आराम

Next

मुंबई :  आधुनिक जीवनशैली, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा यांमुळे बद्धकोष्ठ्ता जडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य वेळी  बद्धकोष्ठ्तेवर उपचार केले नाहीत, तर यातून गंभीर आजार संभवू शकतात. चला बघुया बद्धकोष्ठतेवर काही घरगुती उपाय...

एरंडेल तेल

एरंडेल तेल हा बद्धकोष्ठतेवरील फार जुना उपचार आहे. या तेलामुळे आतड्यातील जंतू मरतात. जर तुम्हाला एक चमचा एरंडेल तेल  पिणे शक्य नसल्यास ते ग्लासभर दुधात एकत्र करून रात्री प्यावे. आतड्याच्या धीम्या  कार्यामुळे   बद्धकोष्ठतेचा त्रास संभवतो तो दूर होईल.

अंजीर

सुके वा ओले अंजीर दोन्ही बद्धकोष्ठतेवर फारच गुणकारी आहेत. त्यातून शरीराला पुरेसे फायबर मिळतात.  बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी काही अंजीर दुधात उकळून हे मिश्रण रात्री प्यावे. बाजारात मिळणाऱ्या रसापेक्षा अख्खे  अंजीर खाणे अधिक फलदायी ठरेल.

(गॅस आणि अॅसिडीटीपासून कशी मिळवाल सुटका?)

लिंबू

आयुर्वेदात लिंबाचे अतिशय महत्त्व आहे. सकाळी अनशन पोटी घेतलेले लिंबुपाणी पोट साफ करण्यास मदत करते. तसेच  या मिश्रणात मीठ टाकल्यास त्यामुळे शौचास सुलभ होण्यास मदत होते. लिंबू पाण्यामुळे आतडी व पर्यायाने शरीर स्वच्छ होते

संत्री

संत्र हे व्हिटामिन ‘सी’ व फायबरने समृद्ध आहे. फळांतील फायबरमुळे पोट साफ होते. सकाळ संध्याकाळ संत्री खाण्याने  बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. संत्री रक्त शुद्ध करण्यास, पचनशक्ती वाढवण्यास, अत्यंत गुणकारी आहेत.

(उन्हाळ्यात मिळणा-या करवंदाचे औषधी गुण माहीत आहेत का?)

मनुका

मनुकादेखील बद्धकोष्ठतेवर फारच गुणकारी आहेत. त्यातील फायबर घटकांमुळे पोट स्वच्छ होते . रात्रभर पाण्यात भिजवलेले  काळी मनुका सकाळी पाण्यासकट खाल्याने फार फायदा होतो. गर्भवती स्त्रियांसाठी हा उपचार अतिशय उपयुक्त आहे. यामुळे कोणताही साईड इफेक्ट होत नाही  .

पालक

पालक शरीरातील आतड्यांचा मार्ग स्वच्छ करून पुनरुजीवित करण्यास मदत करते. 100 मिली पालक रस  व पाणी  समप्रमाणात रोज पाण्यासोबत दोनदा घेतल्यास  बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तीव्र बद्धकोष्ठतेच्या त्रासावरदेखील पालक हितावह आहे.

सफरचंदाचा रस

तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर नियमित रुपात सफरचंदाचा रस पिणं फायदेशीर ठरेल. सफरचंदात मोठ्या प्रमाणात फायबर आढळतं. फायबर तत्व बद्धकोष्ठतेचा त्रास फटाफट दूर करतात. 

(अर्धडोकेदुखी किंवा मायग्रेनच्या त्रासापासून असा मिळवा आराम?)

मोसंबी रस

बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी सहज उपलब्ध असलेला मोसंबी रसाचीही गोडी तुम्ही चाखू शकता. हा रस नियमितपणे घेतल्यास तुमच्या तक्रारी कधी दूर होतील, हे तुम्हाला कळणारदेखील नाही. मोसंबीतही फायबरचं प्रमाण मोठं असतं. 

अननसाचा रस

अननस हे फायबरचं उत्कृष्ठ स्त्रोत आहे. बद्धकोष्ठतेवर उपाय म्हणून तुम्ही अननसाचा रस घेऊन शकता... अननसाचा रस आवडत नसेल तर फळच खाऊन टाका.

Web Title: Home remedies on constipation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.