खोकला झालाय?; मग औषधं घेण्याआधी करून पाहा 'हे' घरगुती उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 02:37 PM2019-07-31T14:37:59+5:302019-07-31T14:38:38+5:30
पावसाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या वाढतात. या वातावरणात इतर समस्यांपेक्षा सर्वात जास्त त्रास होणारी समस्या म्हणजे, खोकला.
पावसाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या वाढतात. या वातावरणात इतर समस्यांपेक्षा सर्वात जास्त त्रास होणारी समस्या म्हणजे, खोकला. परंतु, प्रत्येकवेळी खोकल्यासाठी औषधं घेणं फायदेशीर ठरेल असं नाही. जर तुम्हालाही खोकला झाला असेल तर कोणत्याही औषधाआधी काही घरगुती उपाय करणं फायदेशीर ठरतं.
आल्याचा चहा
आल्याचा चहा खोकला दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. जर तुम्हाला खोकला असेल तर दररोजच्या चहामध्ये आल्याचा एक तुकडा एकत्र करा. आलं इन्फेक्शन दूर करण्यासाठी मदत करतो. तसेच गरम चहा घशाच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतो.
गरम पाण्याने गुळण्या करा
अनेकदा खोकला झाल्यावर घशामध्ये कफ जमा होतो. यावर सर्वात योग्य उपाय म्हणजे, गरम पाण्यामध्ये मीठ घालून त्याच्या गुळण्या करणं. गुळण्या केल्यामुळे घशातील सर्व कफ दूर होण्यास मदत होते.
वाफ घ्या
खोकला आणि सर्दी या दोन्ही परिस्थितीमध्ये श्वास नलिकेमध्ये कफ जमा होतो. ज्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होतो. कफ दूर करण्याची सर्वात उत्तम पद्धत म्हणजे, वाफ घेणं. ही पद्धत खोकला आणि घशात होणारी खवखव दूर करण्यासाठी मदत करते. तुम्ही वाफ घेण्यासाठी स्टिमरची मदत घेऊ शकता.
आल्याचा रस आणि मध
आल्याच्या रसामध्ये मध एकत्र करा आणि तयार मिश्रण दिवसातून दोन वेळा एक-एक चमचा घ्या. आराम मिळेल. आलं शरीराला इन्फेक्शनपासून लढण्यासाठी शक्ती देतं. तसेच घशाच्या समस्या दूर करण्यासाठीही मध अत्यंत लाभदायक ठरतं. त्यामुळे या दोन्ही पदार्थांच मिश्रण खोकला दूर करण्यासाठी मदत करतं.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती असून आम्ही ते केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.