घरी असताना किंवा बाहेर अचानक BP Low झाल्यास; त्वरित करा 'या' पदार्थांचे सेवन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 09:46 AM2020-09-06T09:46:31+5:302020-09-06T09:52:02+5:30

अनेकदा प्रवासादरम्यान,ऑफिसमध्ये कामाचा ताण असल्यास  किंवा घरी एकटं असताना बीपी लो होण्याची समस्या उद्भवू शकते.

Home remedies cure for low blood pressure how to control low blood pressure | घरी असताना किंवा बाहेर अचानक BP Low झाल्यास; त्वरित करा 'या' पदार्थांचे सेवन

घरी असताना किंवा बाहेर अचानक BP Low झाल्यास; त्वरित करा 'या' पदार्थांचे सेवन

googlenewsNext

रोजचं जीवन जगत असताना वेगवेगळ्या आरोग्याच्या तक्रारींचा सामना सगळ्यांनाच करावा लागतो. आजकाल लठ्ठपणा आणि रक्तदाबासंबंधी समस्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना उद्भवणाचा धोका असतो. उच्च रक्तदाब हे आरोग्यासाठी घातक ठरतं त्याचप्रमाणे अचानक रक्तदाब कमी झाल्यानेही शरीराला नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. अनेकदा प्रवासादरम्यान,ऑफिसमध्ये कामाचा ताण असल्यास  किंवा घरी एकटं असताना बीपी लो होण्याची समस्या उद्भवू शकते.

दिवसभरातील  शारीरिक हालचाल, औषधं, खाण्यापिण्याच्या सवयी यासारख्या काही गोष्टींवर आपला रक्तदाब अवलंबून असतो. आज आम्ही तुम्हाला रक्तदाब कमी झाल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन त्वरित करायला हवं याबाबत सांगणार आहोत.  जेणेकरून तुम्हाला आरोग्याचं होणारं नुकसान टाळता येईल. 

सिर्फ हाई ब्लड प्रेशर ही खतरनाक नहीं होता है, लो ब्लड प्रेशर भी काफी खतरनाक होता है- सांकेतिक तस्वीर

साखर आणि मीठाचे पाणी

अचानक रक्तदाब कमी झाल्यानंतप इलेक्ट्रॉड पावडर किंवा साखर आणि मीठाचं पाणी पिणं आवश्यक आहे.  रक्तदाब कमी झाल्यानंतर त्वरित साखर आणि मीठाचं पाणी प्यायल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो.  याशिवाय तुम्ही लिंबू पाण्याचंही  सेवन करू शकता. तुम्ही कामासाठी बाहेर पडत असाल तर नेहमी पाणी आणि साखर सोबत ठेवा.

कॉफी

रक्तदाब कमी झाल्यास कॉफीचं सेवनही शरीरास फायदेशीर ठरतं. कॉफीचं सेवन केल्यानं रक्तदाब नियंत्रात राहतो. अनेकांची  सकाळ ही कॉफी प्यायल्यानंतर सुरू होते. जर चहा किंवा कॉफी घेतला नाही तर अनेकांना डोकं जड झाल्यासारख वाटतं. पण कॅफिनचं सर्वाधिक सेवन केल्याने आरोग्यासाठी घातक ठरू शकतं  तसंच कॉफी योग्यवेळी घेतली नाही तर शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. उपाशी पोटी कॉफी प्यायल्यास शरीरासाठी नुकसानकारक ठरतं. यामुळे अ‍ॅसिडीटी, अपचन आणि गॅस यांसारखे पोटाचे विकार होण्याची दाट शक्यता असते. 

गोड पदार्थ

अचानक रक्तदाब कमी झाल्यानंतर गोड पदार्थांचे सेवन करणं फायदेशीर ठरेल. रक्तदाबाची समस्या असलेल्यांनी केळी, पपई, मुळा या पदार्थांचा आहारात  समावेश करायला हवा. बाहेर जाताना सोबच एखादं चॉकलेट किंवा साखर ठेवल्यास अचानक असा त्रास झाल्यास उपयोगी ठरू शकतं. 

रोज व्यायाम करणं

व्यायाम किंवा योगा रोज केल्यानं रक्तदाबाची समस्या उद्भवत नाही. उद्भवल्यास कमी तीव्रतेनं उद्भवते. यासाठी २० ते ३० मिनिट वेळ काढून रोज व्यायाम करणं गरजेचं आहे. याशिवाय सकाळी गरम पाणी प्यायल्याने ब्लड फ्लो आणि सर्क्युलेशन सुधारण्यासाठी मदत होते. तसेच हे रक्तदाब नॉर्मल ठेवण्यासाठीही मदत करतं.

जेष्ठमध

कमी रक्तदाबावर ज्येष्ठमध परिणामकारक ठरतं. ज्येष्ठमधामुळे रक्तवाहिन्या, हृदयाचं कार्य सुरळीत राहतं. त्यामुळे ज्येष्ठमधाचा काढा घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय घसा दुखत असेल किंवा सर्दी, खोकल्याची समस्या  जाणवत असेल तर ज्येष्ठमध चघळ्याचा सल्ला दिला जातो.  तोंड येणे, घसा खराब असणे, दम लागणे अशा समस्यांसाठी ज्येष्ठमध गुणकारी ठरते.  ज्येष्ठमधाचा काढा तयार करून प्यायल्यास आराम मिळतो. 

तुळस

तुळशीत अनेक औषधी गुणधर्म असतात. कमी रक्तदाबावर तुळस उपयुक्त ठरते. तुळशीची दहा-पंधरा पानं खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसंच तुळशीमध्ये असलेले इगेनॉल द्रव्य मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते. रोज सकाळी तुळशीची पाने खाल्याने अथवा तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

हे पण वाचा-

आरोग्यदायी आवळ्याच्या रसाचे 'हे' ५ फायदे वाचून अवाक् व्हाल; स्वतःसह कुटुंबही राहील निरोगी

WHO नं चिंता वाढवली! कोरोना लसीचे व्यापक लसीकरण २०२१ च्या मध्यापर्यंत अशक्य

Web Title: Home remedies cure for low blood pressure how to control low blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.