पोटात सतत जळजळ होत असेल तर 'या' घरगुती उपायांनी मिळेल आराम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 05:03 PM2020-02-12T17:03:20+5:302020-02-12T17:13:31+5:30

बाहेरचं काहीही खाल्ल्यानंतर अचाननक पोटात जळजळ होणे, छातीत दुखणे, एसिडीटी यांसारख्या समस्या उद्भवत असतात.

Home remedies to eliminate stomach irritation, you will get instant relief | पोटात सतत जळजळ होत असेल तर 'या' घरगुती उपायांनी मिळेल आराम

पोटात सतत जळजळ होत असेल तर 'या' घरगुती उपायांनी मिळेल आराम

googlenewsNext

बाहेरचं काहीही खाल्ल्यानंतर अचानक पोटात जळजळ होणे, छातीत दुखणे, एसिडीटी यांसारख्या समस्या उद्भवत असतात. खाण्यापिण्याच्या सवयींबरोबरच पोटात त्रास होण्याची अनेक कारणं असू शकतात. जास्त प्रमाणात चहा आणि कॉफीचे सेवन केल्यामुळे सुद्धा एसिटिडीची समस्या वाढत जाते. घरात असलेल्या काही पदार्थांचा आहार समावेश करून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणते असे उपाय आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही पोटाच्या समस्यांपासून दूर राहू शकता. 

केळं

केळं पोटाच्या समस्येवर चांगला उपाय आहे. केळं खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते, कारण केळे खाल्ल्याने स्नायूंची हालचाल, आकुंचन-प्रसरण व्यवस्थित होऊन आतडय़ामध्ये साचलेला मळ पुढे ढकलण्यास मदत होते.

दालचीनी

मसाल्याच्या पदार्थात दालचीनीचा वापर केला जातो.  पोट साफ होण्याची समस्या उद्भवत असेल तर  दालचीनीचा  आहारात समावेश केल्याने शरीरातील पाचनक्रिया सुरळीत राहते. 

गुळ

तुमच्या पोटात जळजळ होत असेल तर दररोज जेवण झाल्यानंतर गुळ खावा. गुळ खायचा नाही तर तो काही वेळासाठी तोंडात ठेवायचा. मग त्यानंतर जेणेकरून तो तोंडात विरघळेल. या प्रक्रिया जेवढी हळू होईल तेवढा त्याचा फायदा जास्त होईल. यामुळे पोटाची पचनक्रियेची क्षमता वाढते आणि जळजळ होण्याची समस्या दूर होते. 

बडीशोप

एक कप उकळलेल्या पाण्यात  एक चमचा बडीशेप मिसळून रात्रभर ठेवून द्या. सकाळी ते गाळून आणि त्यात एक चमचा मध मिसळून ते पाणी प्यावं. हे पाणी दिवसभरात ३ वेळा प्यायल्यानं एसिडीटीची आणि गॅसची समस्या दूर होते. 

टोमॅटो 

पोटातली जळजळ दूर करण्यासाठी टोमॅटो खूप फायदेशीर आहे. कच्चा टोमॅटो आपल्या डाएटमध्ये दररोज घ्या. यामुळे एसिडीटी आणि पोटाची जळजळ या समस्या उद्भवत नाहीत. टोमॅटो शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढवतात. 

आल्याचा रस 

आल्याचा रस देखील पोटातली उष्णता आणि जळजळ ठिक करण्यासाठी उपयुक्त ठरतं. लिंबू आणि मधात आल्याचा रस मिसळून पाणी प्यायल्यानं पोटातली जळजळ थांबते. या व्यतिरिक्त आल्याच्या रसात एंटीबॅक्टीरिअल गुण देखील असतात. त्यासाठी हे गुण पोटातील असलेल्या हानिकारक बॅक्टेरिया मारतात. ( हे पण वाचा-हाय बीपीला घाबरताय? मग 'हे' वाचाच, गैरसमज होतील दूर...)

ओवा 

एका पॅनमध्ये ओवा गरम करून त्याची पावडर तयार करा. यात काळं मीठ मिसळा. हे खाल्ल्यानंतर गरम पाण्यातून घेतल्यानं पोटातली उष्णता आणि एसिडीटी दूर होते. ( हे पण वाचा-'हा' दुर्मिळ प्राणी खाल्ल्यामुळे पसरला कोरोना व्हायरस!)

Web Title: Home remedies to eliminate stomach irritation, you will get instant relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.