पाठदुखी पाठ सोडत नाहीये? हे घरगुती उपाय तुम्हाला देतील त्वरित आराम, आजच जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 05:24 PM2022-07-15T17:24:42+5:302022-07-15T17:27:00+5:30
कंबरदुखी बरे करण्याचे अनेक मार्ग आहेत ज्यात औषधी वनस्पतींपासून मसाजपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. घरीच काही खबरदारी घेतली तर त्यावर सहज उपचार होऊ शकतात.
आजकाल कंबरदुखीचा त्रास वाढत्या वयातच नाही तर तरुणांमध्येही दिसतो. आपल्या आयुष्यात कंबरदुखीची 84 टक्के शक्यता असते. अनेक वेळा लोक कंबरदुखीला जीवनशैलीचा भाग बनवतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. कंबरदुखीचे कारण गंभीरच आहे असे नाह. वाढत्या वयाबरोबर याचा त्रास वाढत जातो. कंबरदुखी बरे करण्याचे अनेक मार्ग आहेत ज्यात औषधी वनस्पतींपासून मसाजपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. घरीच काही खबरदारी घेतली तर त्यावर सहज उपचार होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती उपाय (Back Pain Home Remedy) सांगणार आहोत. जे वापरून तुम्हाला कंबरदुखीपासून आराम मिळेल.
वेदना कमी करण्यासाठी तेल
हेल्थलाइनच्या मते, कंबरदुखी कमी करण्यासाठी अनेक मलम आणि तेल उपलब्ध आहेत. जर वेदनादायक भागावर लॅव्हेंडर इसेन्शियल ऑईलचा वापर केला तर वेदनेवर त्वरित आराम मिळू शकतो. हे तेल सहज उपलब्ध आहे. त्यामुळे याचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता.
मालिश आवश्यक
वेदना असलेल्या किंवा ताणलेल्या स्नायूंना हळूवारपणे मालिश करणे ही सर्वात प्रभावी पद्धत आहे. मालिश केल्याने कंबरदुखी कमी होते. यासोबतच पाठीचे कार्यही सुधारते. मसाजसाठी तुम्ही तुमच्या आवडीचे तेल किंवा क्रीम निवडू शकता.
सॉल्ट बाथ
कंबरदुखीपासून आराम मिळवण्यासाठी सॉल्ट बाथ ही खरोखरच एक चमत्कारिक पद्धत आहे. व्यायामानंतर सॉल्ट बाथ घेता येतो. यामध्ये एप्सम सॉल्ट किंवा मॅग्नेशियम सल्फेट त्वचेद्वारे शरीराच्या स्नायूंमध्ये जाऊन काम करते. दुखण्यापासून आराम मिळविण्यासाठी किमान 20 मिनिटे सॉल्ट बाथ घ्यावा. यासाठी हलके कोमट पाणी वापरावे. यामुळे शरीरातील वेदना आणि पेटके दूर होतात.