सायनसच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर 'हे' घरगुती उपाय देतील लवकर आराम, वाचा अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 05:00 PM2022-09-27T17:00:31+5:302022-09-27T17:07:47+5:30

सायनसच्या इन्फेक्शनपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

home remedies for sinus know more | सायनसच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर 'हे' घरगुती उपाय देतील लवकर आराम, वाचा अधिक

सायनसच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर 'हे' घरगुती उपाय देतील लवकर आराम, वाचा अधिक

googlenewsNext

सायनस इन्फेक्शन असा आजार आहे, जो कोणत्याही वयात होऊ शकतो. या आजाराचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. हे इन्फेक्शन सर्दी, प्रदूषण आणि अ‍ॅलर्जीमुळे होतं, परंतु त्याचा त्रास झाल्यानंतर शारीरिक तसंच मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं. कारण सायनसचा त्रास असलेल्या रुग्णांना ताप येणं, पापण्यांच्या दोन्ही बाजूंना दुखणं, सूज येणं यासारखी लक्षणं दिसतात, तसंच त्यांच्या चेहऱ्यावर ताण दिसू शकतो. सायनसच्या रुग्णांच्या नाकात आणि घशात नेहमीच कफ असतो.

या रुग्णांना धूळ आणि धुराचा सर्वाधिक त्रास होतो. सायनसची समस्या वाढल्यास अस्थमा, दमा यासारखे गंभीर आजार होऊ लागतात, त्यामुळे सायनसच्या इन्फेक्शनपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

अ‍ॅपल सीडर व्हिनेगर
स्टाइल क्रेझ डॉट कॉमच्या मते, सायनसच्या संसर्गापासून आराम मिळवण्यासाठी, अ‍ॅपल सीडर व्हिनेगर पाण्यात मिसळून दिवसातून दोनदा प्या किंवा गुळण्या करा. कारण त्यात असलेले अँटिबॅक्टेरियल आणि अँटिफंगल गुणधर्म नाकातील सायनसमधील पीएच संतुलित करतात आणि जमा झालेला कफ काढून टाकतात. तसंच ते प्यायल्याने अ‍ॅलर्जीची लक्षणंही कमी होतात.

तोंडावर खोबरेल तेल लावा
खोबरेल तेल वितळवून ते आपल्या तोंडावर 5 मिनिटं माऊथवॉश म्हणून लावा आणि कोमट पाण्याने तोंड धुवा. सायनसच्या समस्येपासून आराम मिळेपर्यंत हे दररोज करा.

मध वापरा
सायनसच्या इन्फेक्शनदरम्यान नाक आणि घशाला सूज येऊ शकते, ही सूज मधाच्या सेवनाने कमी होते. बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढण्यासाठी मधामध्ये अँटिमायक्रोबायल घटक असतात. दिवसातून दोनदा मध पिणं सायनसच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

डिटॉक्स आंघोळ करा
आंघोळ करताना, तुमच्या बाथटबमध्ये कोमट पाणी घ्या, त्यात 1 कप एप्सम मीठ, अर्धा कप बेकिंग सोडा, 6 ते 8 थेंब टी ट्री ऑइल टाका आणि दररोज 15 ते 20 मिनिटे आंघोळ करा. यामध्ये असलेले अँटिबॅक्टेरियल एजंट तुमच्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ काढून टाकून तुम्हाला सायनसपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात.

सायनस हा आजार गंभीर आहे, सुरुवातीला साधी सर्दी किंवा अ‍ॅलर्जी समजून त्याकडे दुर्लक्ष करणं कालांतराने महागात पडू शकतं. त्यामुळे तुम्हाला सायनसचा त्रास असेल तर हे घरगुती उपाय करून पाहा. शिवाय तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर लवकरातलवकर डॉक्टरांची भेट घ्या आणि त्यावर उपचार घ्या.

Web Title: home remedies for sinus know more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.