डोळ्यांचा थकवा आणि दुखणं या 5 घरगुती उपायांनी करा दूर, मग बघा कमाल....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 02:52 PM2022-10-10T14:52:03+5:302022-10-10T15:00:25+5:30
डोळे लाल होणे, जळजळ होणे, निट न दिसणे, डोळे कोरडे पडणे, धुसर दिसणे अशाही समस्या होतात. काही घरगुती उपायांच्या माध्यमातून ही समस्या दूर केली जोऊ शकते.
अनेकदा उशिरापर्यंत काम केल्या कारणाने किंवा लागोपाठ अनेक तास वाचन केल्याने किंवा सतत कम्प्युटरवर काम करत राहिल्याने डोळ्यांना थकवा जाणवतो. मोबाईल आणि कमी झोप यामुळेही समस्या होऊ शकते. या कारणांमुळे डोळे दुखणे, सूज येणे अशा समस्या होतात. हा त्रास जास्त वाढला तर अनेक गंभीर समस्यांनाही सामोरे जावे लागते. डोळे लाल होणे, जळजळ होणे, निट न दिसणे, डोळे कोरडे पडणे, धुसर दिसणे अशाही समस्या होतात. काही घरगुती उपायांच्या माध्यमातून ही समस्या दूर केली जोऊ शकते.
थंड पाणी
जर तुमच्या डोळ्यांना तणावासोबतट सूजही दिसत असेल डोळ्यांना थंड पाण्याने धुवून ध्या किंवा तुम्ही बर्फानेही डोळे शेकू शकता. यासाठी एका स्वच्छ सूती कापडात बर्फ ठेवा आणि डोळ्यांना लावा. असे केल्याने ५ ते १० मिनिटात डोळ्यांची सूज कमी होईल. त्यासोबतच डोळ्यांना आरामही मिळेल.
गुलाबजल
गुलाबजल हे डोळ्यांसाठी नैसर्गिक रिलॅक्सर म्हणून काम करतं. सोबतच याने डोळ्यांखाली झालेले डार्क सर्कलही दूर होतात. त्वचा मुलायम आणि आकर्षक दिसते. तसेच गुलाबजलच्या दररोजच्या वापराने डोळे चांगले राहतात.
काकडी
काकडीचे स्लाइस डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांचा थकवा दूर होतो. याने तुमच्या डोळ्यांना थंड वाटेल आणि तुमचा थकवा दूर होईल.
डोळ्यांचा व्यायाम
वरील उपायांसोबतच डोळ्यांचे काही व्यायाम केल्यास डोळ्यांचा थकवाही दूर होतो. डोळ्यांचा व्यायाम केल्याने डोळ्यातील रक्तसंचारही निट होतो. याने डोळ्यांच्या मासंपेशीही लवचिक होतात. यासाठी तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे.
दूध
डोळ्यांचं दुखणं आणि थकवा दूर करण्यासाठी दूधाचाही फायदा होतो. कापसाच्या मदतीने डोळ्यांची दुधाने मसाज करा. मसाज करताना डोळे काही बंद करा.