घरगुती उपायांनी दुर करता येत युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, महिलांनी घ्या ही विशेष काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 03:27 PM2022-08-22T15:27:59+5:302022-08-22T15:30:02+5:30

यूटीआयपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही येथे सांगितलेल्या या घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.

home remedies for UTI means urinary track infection | घरगुती उपायांनी दुर करता येत युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, महिलांनी घ्या ही विशेष काळजी

घरगुती उपायांनी दुर करता येत युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, महिलांनी घ्या ही विशेष काळजी

Next

लोकांना यूटीआय म्हणजेच मूत्रमार्गात संसर्ग होणे सामान्य झाले आहे. हा संसर्ग पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होऊ शकतो, परंतु बहुतेकवेळा हा स्त्रियांनाच जास्त होतो. स्वच्छतेची काळजी न घेणे हे त्याचे मुख्य कारण असल्याचे मानले जात असले तरी, त्याच्या इतर कारणांमध्ये गर्भनिरोधकांचा अतिवापर, लघवी पूर्णपणे न होणे, जुलाब, स्टोन येणे, रजोनिवृत्तीचा कालावधी, रोग प्रतिकारशक्तीचा कमी असणे, अँटिबायोटिक्स घेणे यांचा समावेश आहे. इतर काही कारणे जसे की औषधे, अति खाणे.

यूटीआय संसर्ग ई-कोलाय बॅक्टेरियामुळे होतो आणि जेव्हा मूत्राशय आणि लघवीच्या नळ्यांना जीवाणूंचा संसर्ग होतो तेव्हा होतो. UTI ची अनेक लक्षणे असू शकतात, जसे की मूत्राशयाच्या आवरणाला सूज येणे, लघवी करताना वेदना होणे किंवा जळजळ होणे, लघवी लहान किंवा रक्तरंजित होणे, पोटात दुखणे आणि ताप येणे. यूटीआयपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही येथे सांगितलेल्या या घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.

आवळा आणि हळद
UTI च्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आवळा आणि हळदीचा वापर करू शकता. यासाठी एक चमचा आवळा पावडर आणि एक चमचा हळद मिसळा. हे मिश्रण पावडर एक कप पाण्यात उकळवा. जेव्हा ते अर्धे कमी होईल तेव्हा काही तासांच्या अंतराने दिवसातून चार वेळा प्या.

टी ट्री तेल
यूटीआयच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही टी ट्री ऑइलचा वापर करू शकता. या तेलात बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करणारे अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात. या तेलाचे काही थेंब काही पाण्यात मिसळा आणि दिवसातून तीन ते चार वेळा या पाण्याने तुमचा प्रायव्हेट पार्ट धुवा.

ब्लूबेरी आणि क्रॅनबेरी
यूटीआयची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही ब्लूबेरी आणि क्रॅनबेरीची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्ही दररोज अर्धा ग्लास ब्ल्यूबेरी आणि क्रॅनबेरी ज्यूसचे सेवन करावे. याच्या सेवनाने बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते.

अननस
UTI पासून आराम मिळवण्यासाठी अननसदेखील मदत करू शकतात. यासाठी रोज एक कप अननसाचे सेवन करावे किंवा त्याचा रस एक ग्लास प्यावा.

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर-लिंबू-मध
यूटीआय संसर्गापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर, लिंबू आणि मध वापरू शकता. यासाठी एका ग्लास पाण्यात दोन चमचे अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर घ्या आणि त्यात काही थेंब लिंबाचा रस आणि काही थेंब मध टाकून ते प्या.

Web Title: home remedies for UTI means urinary track infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.