अपचन, अॅसिडीटी आणि पोटदुखीपासून या 7 घरगुती उपायांनी मिळवा आराम!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 10:42 AM2018-07-26T10:42:38+5:302018-07-26T10:43:20+5:30
अॅसिडीटी, ब्लोटिंग किंवा अपचन या समस्यांसाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची तशी गरज पडत नाही. कारण तुम्ही घरच्या घरी काही सोप्या उपायांनी या समस्या दूर करू शकता. चला जाणून घेऊया काही खास घरगुती उपाय...
कधी काही चुकीचं किंवा जास्त खाल्याने तुम्हाला अपचनाची समस्या होते यात काहीच दुमत नाहीये. अॅसिडीटी, ब्लोटिंग किंवा अपचन या समस्यांसाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची तशी गरज पडत नाही. कारण तुम्ही घरच्या घरी काही सोप्या उपायांनी या समस्या दूर करू शकता. चला जाणून घेऊया काही खास घरगुती उपाय...
१) पोट फूगण्याच्या समस्येसाठी आलं
आलं हे फार उपयोगी औषध मानलं जातं. यात वोलेटाइल असतं जे पोट फूगण्याच्या समस्येपासून आराम देतं. त्यासाठी तुम्हाला आलं पाण्यात उकळून ते पाणी प्यावं लागेल. याने गॅसची समस्याही दूर होते.
२) अपचनासाठी पुदीन्याचा चहा
पेपरमिंटमध्येही वोलेटाइल हे तत्व असतं जे अपचनाची समस्या दूर करतं. याची पाने उकळून ते पाणी प्यायल्यास आराम मिळतो. तुम्ही याचे काही थेंब पाण्यात टाकूनही पिऊ शकता.
३) लूजमोशनच्या समस्येसाठी अंजीर
अंजीरमध्ये काही प्रोटीन असतात जे नैसर्गिक लॅक्सेटिव म्हणून काम करतात. हे फळ रात्री पाण्याक भिजवून ठेवा आणि सकाळी उठून खावे, त्यावर पाणी प्यावे. याने पोट साफ होईल.
४) पोट फूगण्याचा समस्येसाठी बडीशेप
बडीशेपमध्ये वोलेटाइल तत्व असतात जे पोट फूगसारख्या समस्यांमधून आराम देतात. बडीशेप खाऊन चावल्यास किंवा पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यास आराम मिळेल. याने पोट आणि आतंड्यांची होणारी जळजळ कमी होईल.
५) पदार्थ बारीक करून खावे
काहीही खाल्लं ते चाऊन बारीक करून खावे तसे न केल्यास पोटात गॅसची समस्या होऊ शकते. काही लोक अन्न चाऊन खाण्याऐवजी गिळतात आणि त्यामुळे त्यात लाळ मिश्रित होत नाही. यामुळे पचन होत नाही.
६) वेळेवर खाणे
नाश्ता न करता थेट दुपारी जेवण करणे म्हणजे दरम्यान अनेक तास असतात. यामुळे गॅस आणि अॅसिडीटीची समस्या होऊ शकते. त्यामुळे नाश्ता असो वा जेवण ते वेळेवर करणे गरजेचे आहे.
७) जेवणासोबत कोल्ड्रींक्स नको
जेवणासोबत थंड पेय प्यायल्याने पचन रस आणि एंजाइमचा प्रभाव कमी होतो. यामुळे पचनासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात.