दात किडण्याच्या समस्येपासून कायमची मिळवा सुटका, जाणून घ्या खास उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 10:10 AM2020-01-08T10:10:13+5:302020-01-08T10:25:03+5:30

सध्याच्या काळात बदलेल्या जीवशैलीमुळे शरीराच्या अनेक समस्या उद्भवत असतात.

Home remedies to get rid of cavities and dental pain | दात किडण्याच्या समस्येपासून कायमची मिळवा सुटका, जाणून घ्या खास उपाय

दात किडण्याच्या समस्येपासून कायमची मिळवा सुटका, जाणून घ्या खास उपाय

googlenewsNext

सध्याच्या काळात  बदलेल्या जीवशैलीमुळे शरीराच्या अनेक समस्या उद्भवत असतात. पण शरीरातील काही भागांच्या वेदना अशा असतात की थोडा जरी त्रास झाला  तरी सहन होत नाही.  त्यापैकीच एक म्हणजे दातांचे दुखणे. दात दुखण्याची तसंच दात किडण्याची समस्या लहानांसह मोठ्यांसुध्दा मोठ्या प्रमाणावर होत असते. ही समस्या उद्भवल्यास  होत असलेला त्रास भयंकर स्वरुपाचा असतो.  त्यामुळे तुमचे गाल तसंच कान  दुखण्याची समस्या सुध्दा  निर्माण होऊ शकते. तातडीने पेनकिलर घेण्याशिवाय कोणत्याही प्रकारचा पर्याय उरत नाही.  

अनेकजणांना दाढ दुखीचा त्रास उद्भवल्यास ते लोक वारंवार  पेनकिलर घेतात.  त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या किडनीवर होत असतो.  तसंच दाढ किडल्यानंतर त्यावरील उपचारासाठी डॉक्टरकडे गेल्यास खूप खर्च येतो.  एका दातासाठी ६ ते ८ हजारांपर्यंत पैसे मोजावे लागतात. जर तुम्हाला स्वतःच्या दातांची काळची घ्यायची असेल किंवा दातांना कीड लागण्यापासून वाचवायचं असेल तर काही सोपे उपाय वापरून तुम्ही दाढदुखीच्या समस्येला दूर ठेवू शकता. यामुळे तुमचा खर्च सुध्दा वाचेल तसंच  दात निरोगी राहतील.

कॅविटीज का होतात

साखर किंवा साखरयुक्त चिकट पदार्थ खाल्यास ते दातांना आणि मागच्या बाजूच्या  दाढांना  चिकटून राहतात. त्यामुळे  तुमची दाढ किडायला सुरूवात होते.  यापासून वाचण्यासाठी तुम्ही काही खाल्यानंतर गुळण्या करा. शक्य असल्यास खाल्यानंतर लगेच दात घासा. त्यामुळे कॅविटीज होणार नाहीत. 

लिंबाची पानं

दाढदुखीच्या समस्येला दूर ठेवण्यासाठी लिंबाच्या पानांचा वापर फायदेशीर ठरत असतो.  लिंबाच्या पाल्याने दात घासल्याल तुम्ही समस्यांपासून लांब राहू शकता. यात  एंटी-माइक्रोबियल गुण असतात. ज्यामुळे कॅविटीज होत नाही. याचा वापर करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या पानांची पेस्ट करून लावू शकता. 

लवंग

जर तुमचे दात कीडले असतील किंवा  दुखत असतील तर  तुम्ही लवंगाच्या तेलाचा वापर करून दात व्यवस्थित ठेवू शकता.  त्यासाठी तुम्ही  कापूस राईच्या तेलात बुडवून  दातांमध्ये ठेवू शकता.

लसूण 

लसूण हे आरोग्याच्या दृष्टीने खूप  महत्वाचे असते.  लसणात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असणारे घटक असतात.  दातांना सुद्धा लसूण फायदेशीर ठरत असतं. कॅविटीजचा सामना करण्यासाठी तसंच  दातांना आणि तोंडाला येत असेलला वास दूर करण्यासाठी लसूण खूप फायदेशीर ठरतं असतं. तसंच मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने सुध्दा दात व्यवस्थित राहतात. 

हळद

चांगले पांढरे आणि चमकदार दात तुम्हाला हवे असतील तर तुम्ही  हळदीचा वापर दातांसाठी करू शकता. त्यासाठी तुम्ही  हळद बोटांवर घेऊन  दातांना घासा.  त्यामुळे दातांच्या हिरड्या मजबूत होतात. हिरड्यातून  रक्त येण्याच्या समस्येपासून सुध्दा आराम मिळतो.  कारण हळदीत रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे गुण असतात. 

पेरूची पानं

पेरूच्या पानांची पेस्ट तयार करून दातांवर लावल्याने दात मजबूत होण्यास मदत होते. पेरूच्या पानांना पाण्यात उकळून तुम्ही त्या पाण्याने गुळण्या केल्या तर फायदेशीर ठरेल. पेरूची पानं तुरट चवीची असतात. पण दातांना बळकटी मिळण्यासाठी  उपयुक्त  ठरतात. 

Web Title: Home remedies to get rid of cavities and dental pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.