टाचांच्या दुखण्यापासून सुटका करून घेण्यासाठी  करा 'हे' घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 01:42 PM2018-07-28T13:42:54+5:302018-07-28T13:44:54+5:30

रोजच्या धकाधकीच्या  जीवनात आरोग्याच्या छोट्या छोट्या समस्यांना सामोरं जावं लागतं. या सर्व समस्यांमध्ये एक समस्या असते ती म्हणजे, टाचांच्या दुखण्याची. जास्त वेळ उभं राहिल्यानं किंवा सतत हिल्स घातल्यानं टाचा प्रचंड दुखू लागतात

home remedies for heel pain | टाचांच्या दुखण्यापासून सुटका करून घेण्यासाठी  करा 'हे' घरगुती उपाय!

टाचांच्या दुखण्यापासून सुटका करून घेण्यासाठी  करा 'हे' घरगुती उपाय!

googlenewsNext

(image creadit : Medical News Today)

रोजच्या धकाधकीच्या  जीवनात आरोग्याच्या छोट्या छोट्या समस्यांना सामोरं जावं लागतं. या सर्व समस्यांमध्ये एक समस्या असते ती म्हणजे, टाचांच्या दुखण्याची. जास्त वेळ उभं राहिल्यानं किंवा सतत हिल्स घातल्यानं टाचा प्रचंड दुखू लागतात. याव्यतिरिक्त शरीरातील पोषक तत्वांची कमतरता आणि साखरेचे प्रमाण, फॅट्स, हार्मोन्सचे असंतुलनामुळेही टाचांच्या दुखण्याला सामोरं जावं लागतं. जाणून घेऊयात टाचांचं दुखणं कमी करण्यासाठी काही घरगूती उपाय ज्यांचा उपयोग करून तुम्ही या दुखण्यापासून सुटका करून घेऊ शकता. 

1. टाच्यांच्या दुखण्यापासून सुटका करून घेण्यासाठी दिवसातून कमीतकमी तीन वेळा नारळाच्या तेलानं किंवा मोहरीच्या तेलानं मसाज करा. असं केल्यानं तुम्हाला दुखण्यापासून आराम मिळेल.

2. हळदीमध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टी-ऑक्सिडंट असतात. जे कोणत्याही दुखण्यावर फायदेशीर असतात. टाचांच्या दुखण्यापासूनही सुटका मिळवण्यासाठी एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद आणि मध घालून रात्री झोपण्याआधी घ्या. असे केल्यानं तुमच्या टाचांना आराम मिळेल. 

3. जर तुमच्या टाचा प्रचंड दुखत असतील तर एका टपामध्ये कोमट पाणी घ्या. त्यामध्ये थोडं सैंधव मीठ घाला आणि त्यामध्ये पाय बुडवून बसा. दररोज असे केल्यानं टाचांना दुखण्यापासून आराम मिळेल.

5. दररोज सकाळी अनोशापोटी कोरफडीचा रस घेतल्यानंही टाचांच्या दुखण्यापासून आराम मिळेल. 

Web Title: home remedies for heel pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.