डास पळवण्यासाठी फायदेशीर ठरतात 'हे' उपाय; डेंग्यू, मलेरियापासून होईल बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 05:49 PM2019-07-10T17:49:37+5:302019-07-10T17:50:17+5:30

वातावरणात बदल झाला की, डेंगूची समस्या डोकं वर काढते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे अनेक आजारांनी डोकी वर काढली आहेत.

Home remedies for mosquito free home | डास पळवण्यासाठी फायदेशीर ठरतात 'हे' उपाय; डेंग्यू, मलेरियापासून होईल बचाव

डास पळवण्यासाठी फायदेशीर ठरतात 'हे' उपाय; डेंग्यू, मलेरियापासून होईल बचाव

googlenewsNext

वातावरणात बदल झाला की, डेंगूची समस्या डोकं वर काढते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे अनेक आजारांनी डोकी वर काढली आहेत. या आजारांमध्ये प्रामुख्याने डेंग्यू, मलेरिया यांसारख्या डासांमुळे होणाऱ्या आजारांचा प्रामुख्याने समावेश असतो. आता तर डेंगू पसरवणाऱ्या डासांमुळेच झिका वायरसही पसरू लागला आहे. झिका वायरसवर अजून कोणतही ठोस असं औषध मिळालं नाहीये. त्यामुळे या आजारापासून बचाव करण्यासाठी सध्या सर्वात चांगला उपाय म्हणजे घरात डास येऊ न देणे. त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त उत्पादनांपेक्षा काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. 

डासांना पळवून लावण्यासाठी कडूलिंब फायदेशीर ठरतं. यासाठी खोबरेल तेल व कडूलिंबाचे तेल समान प्रमाणात एकत्र करा आणि अंगाला लावा. याचा परिणाम साधारणतः 8 तास राहतो.

लिंबाचं तेल आणि निलगीरी तेलाचं मिश्रण डासांना घरापासून दूर ठेवण्याचा सर्वात चांगला पर्याय मानला जातो. या मिश्रणाबाबत सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की, हा उपाय नैसर्गिक आहे. दोन्ही तेलांचं मिश्रण तुम्ही अंगावर लावू शकता. याने तुम्हाला डास चावणार नाहीत. 

घरात डास पळवणाऱ्या कॉईल ऐवजी कापूर जाळा आणि 15 ते 20 मिनिटं त्याचा धूर होऊ द्या. डास पळवून लावण्यासाठी याचा सर्वात जास्त फायदा होतो. 

जर तुम्हाला असं वाटत असेल की, झाडांमुळे डास जास्त होतात तर तुम्ही चुकीचा विचार करताय. झाडांचं योग्य रोपण केल्यास तुमच्या घरात डास येणार नाहीत. अंगणात पुदीना, लिंबू, झेंडू, कडूलिंब ही झाडं लावल्यास डास येणार नाहीत. 

दारात किंवा खिडकीत तुळशीचं रोपटं असेल तरिही मच्छर दूर पळून जातात. मच्छरांना घरात प्रवेश करण्यास तुळस प्रतिबंध करते. 

कडूलिंबाचे अनेक फायदे होतात. आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच याने डास पळवण्यासही फायदा होतो. कडूलिंबाचा वास डासांना दूर ठेवतो. कडूलिंबाचं तेल आणि खोबऱ्याचं तेल एकत्र करुन शरीरावर लावा. याने कमीत कमी आठ तास तुमचा डासांपासून बचाव होतो. 

लसणाच्या वासाने डास आजूबाजूलाही फिरकत नाहीत. त्यामुळे लसूण किसून पाण्यात उकळवा आणि रुममध्ये ठेवा. डास दूर पळतील.

लव्हेंडरचा सुगंधानेही डास दूर पळतात. म्हणून घरात लव्हेंडर युक्त रुम फ्रेशनरचा वापर करा.  

Web Title: Home remedies for mosquito free home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.