वारंवार तोंड येत आहे; करा 'हे' उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 03:44 PM2018-07-05T15:44:14+5:302018-07-05T15:44:20+5:30
तोंड येणे या विकाराला माऊथ अल्सर असेही म्हटले जाते. तोंड आल्यावर खाणे तर लांबच पण पाणी पिणेही अवघड होऊन जाते. तोंडाच्या आतल्या भागाला मुख्यतः जीभ, ओठ किंवा टाळा यां भागांना सूज येते किंवा या भागाची त्वचा सोलल्यासारखी होते.
तोंड येणे या विकाराला माऊथ अल्सर असेही म्हटले जाते. तोंड आल्यावर खाणे तर लांबच पण पाणी पिणेही अवघड होऊन जाते. तोंडाच्या आतल्या भागाला मुख्यतः जीभ, ओठ किंवा टाळा यां भागांना सूज येते किंवा या भागाची त्वचा सोलल्यासारखी होते. संपूर्ण तोंड लाल होते. यामुळे काहीही खाताना जिभेची आणि हिरड्यांची आग होते. त्यामुळे आपल्याला खाणे अथवा गिळणेही अशक्य होते. त्यामुळे हा विकार का होतो आणि त्यावर उपाय म्हणून काही घरगुती उपाययोजना केल्यात तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल.
तोंड येण्याची काही कारणे -
1. जास्त मसालेदार, तेलकट, तिखट पदार्थ खाणे
2. शरिरातील 'बी' व्हिटॅमिन आणि अन्य काही पोषक द्रव्यांच्या अभाव
3. चहा, कॉफीचे अतिप्रमाणात सेवन करणे
4. दारू, तंबाखूचे अतिसेवन तसेच अति धुम्रपान
5. जास्त अॅसिडिक पदार्थ खाल्याने
6. शरिरातील उष्णता वाढल्याने
7. तोंडाच्या अस्वच्छतेमुळे इन्फेक्शन झाल्याने
काही घरगुती उपाययोजना -
1. तुळशीची दोन ते तीन पाने चावून खा.
2. खाण्याच्या पानाचा रस काढून त्यात साजूक तुप टाकून मिश्रण तोंड आलेल्या ठिकाणी लावावे.
3. सुक्या खोबऱ्याचे तुकडे चावून खावे.
4. लिबांच्या रसामध्ये मध मिसळून गुळण्या केल्याने आराम मिळतो.
5. भरपूर पाणी प्यावे
6. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ घालून या पाण्याने गुळण्या कराव्यात. असे दिवसातून तीन वेळा केल्याने आराम मिळतो.
7. आहारात दूध, तूप, तोंडलीची भाजी यांसारख्या पदार्थांचा समावेश करावा.