पावसाळ्यात डेंग्यूमुळे ताप आलाय की कोरोना विषाणूंचं संक्रमण झालं आहे; कसं ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 10:40 AM2020-06-28T10:40:20+5:302020-06-28T10:46:50+5:30

गंभीर स्थितीत सतत उलटी येणं, श्वास घेण्याचा वेग वाढणं, पोटात दुखणं,  हिरड्यांमधून रक्त बाहेर येणं, उल्टीतून रक्त बाहेर येणं अशी लक्षणं दिसून येतात. 

Home remedies prevention how to differentiate between coronavirus and dengue | पावसाळ्यात डेंग्यूमुळे ताप आलाय की कोरोना विषाणूंचं संक्रमण झालं आहे; कसं ओळखाल?

पावसाळ्यात डेंग्यूमुळे ताप आलाय की कोरोना विषाणूंचं संक्रमण झालं आहे; कसं ओळखाल?

Next

जगभरातील लोक कोरोना व्हायरसच्या माहामारीनेत्रस्त आहेत. भारतातील रुग्णांची संख्या पाच लाखांपर्यत पोहोचली आहे. भारतात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी असला तरी दिवसेंदिवस संक्रमणाचा धोका वाढत चालला आहे. भारतात सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे कोरोनासोबत डेंग्यूचा आजार पसरण्याची भीती जास्त आहे.

डेंग्यू हा आजार Aedes हा डास चावल्यामुळे होतो.  डेंग्यू आणि कोविड 19ची सुरूवातीची लक्षणं एकसमान असतात. आज आम्ही तुम्हाला या दोन आजाारांमधील फरक कसा ओळखायचा याबाबात सांगणार आहोत. कोरोना व्हायरसचे इन्फेक्शन आणि डेंग्यू या दोन्ही आजारात रुग्णाला ताप येतो. या दोन्ही आजारांची सुरूवातीची लक्षणं सारखीच असतात.

डेंग्यू या आजारात उलटी, सुज येणं, रॅशेज अशी लक्षणं दिसतात. गंभीर स्थितीत सतत उलटी येणं, श्वास घेण्याचा वेग वाढणं, पोटात दुखणं,  हिरड्यांमधून रक्त बाहेर येणं, उल्टीतून रक्त बाहेर येणं अशी लक्षणं दिसून येतात.  कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यास रुग्णांला सुरूवातीला ताप, कफ आणि खोकला, श्वास घ्यायला  त्रास होणं, अशा समस्यांचा सामना करावा लागतो. याशिवाय वास न येणं, त्वचेवर रॅशेज येणं, चव न समजणं अशी लक्षणं दिसून येतात.  दोन्ही आजाारात डॉक्टरांकडून तपासणी करणं गरजेचं आहे.

डेंग्यूंसाठी घरगुती उपाय

डेंग्यूपासून बचावासाठी तुम्ही गुळवेलाचा रस पिऊ शकता. गुळवेलाच्या रसामुळे मेटाबोलिज्म व्यवस्थित होते. त्यासोबतच रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. रोगप्रतिकारकशक्ती वाढल्यास आजारांशी लढता य़ेऊ शकतं. डेंग्यूसाठी गुळवेल सगळ्यात जास्त फायदेशीर असतो.  कारण या आजारात प्लेटलेट्स मोठ्या संख्येने कमी होतात. त्यामुळे तुमचा जीव सुद्धा जाण्याची शक्यता असते. 

जर तुम्ही गुळवेलाच्या रसाचे सेवन केलं तर डेंग्यु होण्यापासून स्वतःचा बचाव करण्यात येतो. रक्तात साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी  गुळवेल फायदेशीर असतं. त्यामुळे डायबिटिस होण्यापासून रोखता येईल. एका अभ्यासानुसार  गुळवेलाच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती वाढल्यामुळे कोरोना विषाणूंच्या संक्रमणापासूनही बचाव करता येऊ शकतो. 

गुळवेलामुळे तुम्हाला सर्दी खोकला किंवा दुसऱ्या आजारांपासून संरक्षण मिळते. यातील हर्ब्स तुमच्या शरीराला स्वच्छ करतात. तसंच शरीराच्या इतर भागातील हानिकारक तत्वसुध्दा दूर शरीराबाहेर टाकण्यात मदत करते. गुळवेलांमध्ये पचनाचे विकार आणि ताण-तणाव दूर करणारे गुण आहेत. ज्यामुळे बध्दकोष्ठ, गॅस आणि इतर समस्या दूर होतात. गुळवेलाच्या सेवनाने भूकही वाढते. ह्यामुळे तुमच्या जीवनातील मानसिक तणाव दूर होऊन तुमचे जीवन आनंददायी होईल.

असा  करा वापर

गुळवेल आणून ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यावे. काढा करण्यासाठी १ कप गुळवेल घेतल्यास त्याच्या  दोन ग्लास पाणी घालावे. हे मिश्रण अर्ध होईपर्यंत उकळून घ्यावे. हा काढा चवीला कडसर लागतो. पण अत्यंत गुणकारी आहे.  गुळवेलाचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.


कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास, स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी नक्की करा 'ही' १० कामं

Coronavirus: आता कोरोनाच्या मुकाबल्यासाठी दोन नव्या आरोग्य विमा पॉलिसी; १० जुलैपर्यंत उपलब्ध

Web Title: Home remedies prevention how to differentiate between coronavirus and dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.