ब्लड शुगर कमी करण्यासाठी घरच्याघरी वापरा 'हे' उपाय, डायबिटीसचा धोका होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 09:45 AM2020-04-12T09:45:47+5:302020-04-12T10:05:47+5:30

डायबिटीसमुळे इंसुलिनच्या निर्मितीत अडथळा येतो. ज्यामुळे शरीरातील ग्लूकोज प्रमाणापेक्षा अधिक वाढू लागतं.

Home remedies to reduce blood sugar and reduce the risk of diabetes myb | ब्लड शुगर कमी करण्यासाठी घरच्याघरी वापरा 'हे' उपाय, डायबिटीसचा धोका होईल कमी

ब्लड शुगर कमी करण्यासाठी घरच्याघरी वापरा 'हे' उपाय, डायबिटीसचा धोका होईल कमी

googlenewsNext

(image credit- medicine net)

जीवनातील नियमीत जीवनशैली, खाण्यापिण्यात झालेले बदल यांमुळे गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. त्यापैकीच म्हणजे डायबिटीस.  रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने डायबिटीसची समस्या उद्भवते. त्यामुळे शरीरातील अनेक भागांवर नकारात्मक परिणाम घडून येत असतो.  डायबिटीसमुळे इंसुलिनच्याच्या निर्मितीत अडथळा येतो. ज्यामुळे शरीरातील ग्लूकोज प्रमाणापेक्षा अधिक वाढू लागतं.

रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण अचानक वाढू लागल्यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. शिवाय तुम्ही प्रत्येक गोष्टीचा ताण घेत असाल तर डायबिटीसची समस्या उद्भवू शकते.पण रक्तातील साखरेचं प्रमाण  निंयत्रणात असेल तर तुम्ही या आजारांपासून लांब राहू शकता. आज आम्ही तुम्हाला घरगुती उपायांनी कशाप्रकारे डायबिटीसला कशाप्रकारे रोखलं जाऊ शकतं. याबाबत सांगणार आहोत.


नियमित व्यायाम करा

शरीरासोबतच मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी नियमीत व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायाम केल्याने शरीर एक्टीव्ह राहतं.  त्यामुळे डायबिटीसची समस्या उद्भवत नाही. शरीरात इंसुलिनचं प्रमाण नियंत्रणात राहतं. त्यासाठी तुम्ही रोज वेळ मिळेल तसा व्यायाम करा. जास्त फायबर्स अ़सलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. 

पेय पदार्थ 

जर तुम्हाला थंड पेय पदार्थ प्यायची सवय असेल तर आजचं बंद करा. कारण पेय पदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असते. सोडा, कोल्ड ड्रिंक्स यात कुत्रिम  फ्लेवर्स असातत. जे शरीरासाठी घातक असतात. त्यासाठी अशा पेयांचे सेवन करणं शरीरासाठी योग्य नाही.   त्यामुळे किडनीशी आणि डायबिटीसशी जोडलेल्या आजारांपासून लांब राहण्यासाठी या पेयांचं सेवन कमी करा. त्यापेक्षा जास्तीत जास्त पाणी प्या. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघून जाण्यास मदत होईल.

बडीशोप

रोज जेवणानंतर बडीशोप खायची सवय अनेकांना असते. ही तशी चांगली सवय आहे. डायबिटीस असणाऱ्या व्यक्तीने रोज बडीशोप खावी. यामुळे डायबिटीस नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसंच सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. लगेच डॉक्टरांशी संपर्क करा. (हे पण वाचा- Coronavirus : 'या' महिन्यापर्यंत वॅक्सीन तयार होणार असल्याचा तज्ज्ञांचा दावा, पण तोपर्यंत काय?)

तुळस 

तुळशीच्या पानामध्ये अँटिऑक्सिडंट गुण आढळतात. त्यामुळे इंसुलिनच्यासाठी ही तुळशीची पानं लाभदायक ठरतात. रिकाम्या पोटी तुम्ही रोज तुळशीची दोन ते तीन पानं खाल्ल्यास अथवा एक चमचा रोज तुळशीचा रस प्यायल्यास, तुमचा डायबिटीस कमी होण्यास मदत होते. ( हे पण वाचा-Coronavirus : कोरोनाग्रस्त रूग्णाच्या मागे चालल्यानेही धोका, वाचा व्हायरसची मजबूत पकड कुठपर्यंत?)

Web Title: Home remedies to reduce blood sugar and reduce the risk of diabetes myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.