लॉकडाऊनमध्ये तुमचं पोट साफ होत नाही का? 'या' उपायांनी पोटाच्या तक्रारी होतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 06:00 PM2020-04-27T18:00:21+5:302020-04-27T18:19:24+5:30

पोटाच्या समस्यांमध्ये गॅस आणि पोट साफ न होण्याची समस्या कॉमन आहे. 

Home remedies for stomach issues and constipation problem myb | लॉकडाऊनमध्ये तुमचं पोट साफ होत नाही का? 'या' उपायांनी पोटाच्या तक्रारी होतील दूर

लॉकडाऊनमध्ये तुमचं पोट साफ होत नाही का? 'या' उपायांनी पोटाच्या तक्रारी होतील दूर

googlenewsNext

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन करण्यात आलं आहे. सध्याच्या घडीला कोरोनापासून बचाव करायचा असल्यास घरी राहण्याशिवाय उत्तम पर्याय नाही. कोरोनामुळे चोवीस तास घरात बसलेल्या लोकांचा कोरोनापासून बचाव होत असला तरी आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत नाही. परिणामी हालचाल होत नाही. पोटाच्या समस्यांमध्ये गॅस आणि पोट साफ न होण्याची समस्या कॉमन आहे. 

कारण उर्जेचा पूरेपूर वापर केला जात नाही.  खालेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन न झाल्यामुळे ही समस्या उद्भवत आहे.  आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तुम्ही स्वतःची  पचनक्रिया व्यवस्थित ठेवू शकता. या उपायांचा वापर केल्यास तुम्हाला लॉकडाऊनमध्ये लहान मोठया कारणांसाठी डॉक्टरकडे जाण्याची वेळ येणार नाही.

उन्हाळ्यात  खालेल्या अन्नाचं पचन मंद गतीने होतं असतं. गरजेपेक्षा जास्त आहाराचं सेवन करणं टाळा. एकाच वेळी भरपेट न जेवता. ठराविक अंतरानं थोडं थोडं खाण्याची सवय लावून घ्या. तेलकट, मेदयुक्त पदार्थ,  खारट, जंकफूडचं सेवन करणं टाळा. साखर, हवाबंद डब्यातील पदार्थ, मसालेदार पदार्थ खाऊ नका. खासकरून मैद्याचे पदार्थ खाऊ नका.

जिरं

जिरं पचनासाठी खूप चांगलं असतं. भाजलेल्या जिऱ्याची एक चमचा पावडर ताकात मिसळून प्या. यामुळे गॅस, अपचनापासून सुटका होईल.

पुदिना

रात्रीचं जेवल्यानंतर पोट जड वाटत असेल तर पुदिन्याची ताजी पाने चावून खा. तसेच पुदिन्याची पाने घातलेला चहा प्या. यामुळे पचनक्रियेशी संबंधित तक्रारीत आराम मिळतो. शक्यतो रात्री भाताचा आहारात समावेश करू नका. त्यामुळे तुम्हाला शरीर जड झाल्यासारखं वाटणार नाही.

मनुके

मनुके ग्लासभर दुधात घालून दूध उकळ वावे. रात्री झोपताना त्या चावून खाव्यात त्यावर गरम दूध प्यावे. असे केल्यास  बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

कडधान्य

मोड आलेल्या कडधान्यांमध्ये फायबर असते. यामुळे बिघडलेली पचनशक्ती सुधारून अन्नपचन योग्य पद्धतीने होते. शारीरिक क्रिया सुरळीत होण्यात मदत होते. त्यासाठी तुम्ही नाष्त्यासाठी मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी खाऊ शकता.  ( हे पण वाचा-घरबसल्या आटपून घ्या 'ही' कामं, लॉकडाऊननंतर जॉब मिळवण्यासाठी ठरतील उपयोगी)

आलं

पोटात गॅस झाल्यास आल्याचा छोटा तुकडा हळूहळू चावावा. त्याचा रस चाखावा. काहीवेळातच गॅसची समस्या दूर होते. ( हे पण वाचा- CoronaVirus : समोर आली कोरोनाची ६ नवी लक्षणं, त्यांच्याकडे करू नका दुर्लक्ष)

Web Title: Home remedies for stomach issues and constipation problem myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.