शिंका, नाक वाहणं यांसारख्या समस्यांपासून 'या' उपायांनी मिळवा सुटका!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 02:48 PM2018-12-17T14:48:30+5:302018-12-17T14:51:04+5:30
हिवाळ्यामधील थंड वातावरण आणि जड हवा यांमुळे अॅलर्जी होण्याचा सर्वात जास्त धोका असतो. त्यामुळे अनेकदा शिंका येणं, नाक वाहणं, घशातील खवखव आणि कफ होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
हिवाळ्यामधील थंड वातावरण आणि जड हवा यांमुळे अॅलर्जी होण्याचा सर्वात जास्त धोका असतो. त्यामुळे अनेकदा शिंका येणं, नाक वाहणं, घशातील खवखव आणि कफ होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. अॅलर्जीमुळे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. साधारणतः सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्या एक आठवड्यापेक्षा जास्त काळ राहत नाहीत. परंतु अॅलर्जी तुम्हाला अगदी महिनाभरसुद्धा किंवा संपूर्ण हिवाळ्यातही त्रासदायक ठरू शकते. याव्यतिरिक्त थंडीमध्ये कधी-कधी ताप, अंगदुखी यांसारख्या समस्यांचाही सामना करावा लागतो. परंतु या समस्या अॅलर्जीमुळे उद्भवत नाहीत.
स्किन अॅलर्जी
हिवाळ्यामध्ये एक्जिमा, एटोपिक डार्माटायटिस आणि कॉन्टॅक्ट डार्माटायटिस यांसारख्या स्किन अॅलर्जी सामान्य असतात. या अॅलर्जीमध्ये खाज येणं तसेच त्वचेवर लाल चट्टे येणं यांसारख्या समस्या होतात.
श्वास घेण्यासाठी त्रास होणं
छातीमध्ये खूप कफ झाल्यामुळे किंवा सर्दी झाल्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होतो. कधी-कधी खोकलाही येतो. हा त्रास घरामध्ये असणाऱ्या पाळीव प्राण्यामुळे किंवा घराच्या आतमध्ये असणाऱ्या धुळीच्या कणांमुळे होतो.
कंजंक्टिवायटिस
डोळे लाल होणं, खाज येणं तसेच डोळ्यांमधून सतत पाणी येणं ही कंजंक्टिवायटिस होण्याची लक्षणं आहेत. थंडीमध्ये उद्भवणाऱ्या समस्यांपैकी ही एक साधारण समस्या आहे. यामुळे खोकला आणि सतत नाक वाहणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
अॅलर्जिक शिनर्स
अॅलर्जिक शिनर्स थंडीमध्ये होणाऱ्या अॅलर्जीपैकी एक आहे. यामध्ये डोळ्यांभोवती काळी वर्तुळं तयार होतात. याचं अॅलर्जी रिअॅक्शन सायनसजवळ ब्लड फ्लो वाढल्यामुळे दिसून येतात. विंटर अॅलर्जीबाबत जाणून घेणं खरचं फार महत्त्वाचं असतं. ही अॅलर्जी कंजंक्टिवाइटिससोबत जोडलेली आहे.
धूळ
जर तुम्ही धूळीमुळे होणाऱ्या अॅलर्जीने पीडित असाल तर तुम्ही नोटिस केलं असेल की, थंडीमध्ये ही समस्या जास्त वाढते. घरातील धूळ कमी करून या समस्येपासून बचाव करता येऊ शकतो. याव्यतिरिक्त पाळीव प्राण्यांच्या संपर्कात येण्यापासून वाचवणं शक्य होतं.
थंडीमध्ये अॅलर्जीचं कारण
घरामध्ये असलेल्या अॅलर्जीपासून बचाव करण्यासाठी धूळ, परफ्यूम आणि पाळीव प्राण्यांचे केस थंड हवेच्या संपर्कात येऊ देऊ नका. घरामध्येच जेवढं शक्य असेल तेवढा व्यायाम करा. तसेच श्वासासंदर्भातील व्यायम करा.
थंडीमध्ये अॅलर्जीपासून वाचण्यासाठी करा हे उपचार :
- भरपूर पाणी प्या.
- शक्य तेवढा आराम करा.
- गरम कपडे परिधान करा.
- घराबाहेर पडताना डोळे आणि नाक व्यवस्थित बांधून मगच बाहेर पडा.
- सनस्क्रिन आणि मॉयश्चरायझरचा उपयोग करा.
- अॅलर्जीपासून वाचण्यासाठी बेडशीट धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा.
- भिंतीवरील फंगलपासून दूर रहा.