डोळ्यांमध्ये पिवळेपणा दिसताच लगेच करा हे उपाय, दुर्लक्ष कराल तर लिव्हर होईल खराब!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 09:40 AM2024-05-10T09:40:35+5:302024-05-10T09:41:06+5:30
Jaundice Home Remedies: ही समस्या तेव्हा जास्त होते जेव्हा शरीरात बिलीरूबिनचं प्रमाण वाढतं. हा एक द्रव्य पदार्थ आहे जो लिव्हरमध्ये लाल रक्तपेशीच्या तुटण्याने तयार होतो.
Jaundice Home Remedies: जॉन्डिस म्हणजेच काविळ हा एक गंभीर आजार आहे. या आजारात लिव्हर प्रभावित होतं आणि वेळीच जर यावर उपचार केले नाही तर लिव्हर खराबही होतं. काविळ झाल्यावर त्वचा आणि डोळे पिवळे दिसू लागतात. तसेच भूकही कमी लागते. ही समस्या तेव्हा जास्त होते जेव्हा शरीरात बिलीरूबिनचं प्रमाण वाढतं. हा एक द्रव्य पदार्थ आहे जो लिव्हरमध्ये लाल रक्तपेशीच्या तुटण्याने तयार होतो.
काविळ होण्याची कारणे वेगवेगळे असू शकतात. पण यावर लगेच उपचार हवे असतात. यादरम्या रूग्णाचं लिव्हर कमजोर होतं. हळूहळू लिव्हर खराब होऊ लागतं. अशात आज आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याने काविळ कमी केला जाऊ शकतो.
पपईची पाने
साइन्स डायरेक्टनुसार, काविळ झाल्यावर पपईच्या पानांचा अर्क वापरला जातो. पपईच्या पानांच्या पेस्टमध्ये एक चमचा मध टाकून सेवन करा. हे नियमित 8 ते 10 दिवस सेवन करा. पपईच्या पानांमध्ये आढळणारे अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि तत्व आरोग्याला खूपसारे फायदे देतात.
मूळ्याची पाने
जॉन्डिसमध्ये मूळ्याची पानेही फार फायदेशीर ठरतात. मूळ्याच्या काही पानांचा रस काढा आणि काही दिवस एक कप रोज प्या. मूळ्याच्या पानांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन आणि फायबर भरपूर असतं. ज्यापासून शरीराला भरपूर पोषण मिळतं.
ऊसाचा रस
जॉन्डिसच्या घरगुती उपायांमध्ये ऊसाचा रसही फायदेशीर मानला जातो. याने पचन तंत्र मजबूत होतं. रोज एक ग्लास ऊसाच्या रसाचं सेवन करा. यात काही थेंब लिंबाचा रसही टाकू शकता.
टोमॅटोचा रस
टोमॅटोचं सेवनही जॉन्डिसमध्ये फायदेशीर मानलं जातं. यासाठी टोमॅटोच्या रसामध्ये थोडी काळ्या मिऱ्याची पावडर टाकून रोज सकाळी सेवन करावं. याने तुम्हाला आराम मिळेल.
काविळची लक्षण
त्वचेच्या रंगात बदल, डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसणे, ताप येणे, थंडी वाजणे, डार्क रंगाची लघवी येणे, मातीच्या रंगाची विष्ठा, त्वचेवर खाज, वजन कमी होणे, उलटी किंवा विष्ठेतून रक्त येणे, पोट दुखणे ही काविळची सुरूवातीची लक्षण आहेत.
काविळ होण्याची कारणे
काही औषधं किंवा आजारांमुळे, दारूच्या अधिक सेवनाने, जेनेटिक मेटाबोलिज्म डिसऑर्डर, पित्ताशयात स्टोन किंवा सूज, पित्ताशयाचा कॅन्सर, अग्नाशयाचा कॅन्सर, डायबिटीस, लठ्ठपणा, नॉन-अल्कोहल फॅटी लिव्हर डिजीज इत्यादीमुळे काविळ होऊ शकतो.
काय खाऊ नये?
काविळ जर झाला असेल तर तेलकट, मसालेदार, फास्ट फूड, तळलेले पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. सोबतच मांसही खाऊ नये. साधा घरगुती आहार घ्यावा ज्यातून तुम्हाला पोषक तत्व मिळतील.
(टिप - ही केवळ एक सामान्य माहिती आहे. कोणतेही उपाय करण्याआधी एक्सपर्ट किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण प्रत्येकाला हे उपाय लागू पडतील असं नाही.)