जुलाब लागल्याने वाढल्या टॉयलेटच्या फेऱ्या, जाणून घ्या यावर काही खास घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 10:46 AM2024-07-02T10:46:47+5:302024-07-02T10:49:05+5:30

Stomach Problems: जर तुम्हाला ही समस्या झाली असेल तर घरीच यावर सोपे उपाय करू शकता. हे घरगुती उपाय काय आहे हे जाणून घेऊ. 

Home remedies to get rid of loose motions diarrhea | जुलाब लागल्याने वाढल्या टॉयलेटच्या फेऱ्या, जाणून घ्या यावर काही खास घरगुती उपाय!

जुलाब लागल्याने वाढल्या टॉयलेटच्या फेऱ्या, जाणून घ्या यावर काही खास घरगुती उपाय!

Stomach Problems: पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे किंवा चुकीचं खाल्ल्यामुळे अनेकदा पोटाची समस्या होते. अनेकांना जुलाब होतात. ज्यामुळे त्यांना सतत टॉयलेटच्या फेऱ्या माराव्या लागतात. तसेच पोटदुखी आणि पोट फुगण्याची समस्याही होते. अशात जर तुम्हाला ही समस्या झाली असेल तर घरीच यावर सोपे उपाय करू शकता. हे घरगुती उपाय काय आहे हे जाणून घेऊ. 

दही खा

जुलाबाची समस्या दूर करण्यासाठी दही फार फायदेशीर ठरतं. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स आढळतात. जे चांगले बॅक्टेरिया रिस्टोर करतात आणि पोटाचं आरोग्य चांगलं ठेवतात. दह्यामुळे पचनही चांगलं होतं आणि जुलाब बंद होतात.

मेथीचे दाणे

मेथीच्या दाण्यांमध्ये अनेक औषधी गुण असतात. या दाण्याच्या सेवनाने पोटाला आराम मिळतो आणि जुलाबाची समस्याही दूर होते. मेथीच्या दाण्याचं सेवन करण्यासाठी एक चमचा मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात टाकून उडकून घ्या. हे पाणी कोमट झाल्यावर सेवन करा. याने जुलाब बंद होतील.

लिंबू पाणी

जुलाब लागल्यावर लिंबू पाणी पिणं फार फायदेशीर ठरतं. जुलाब लागल्यावर कमजोरी जाणवते. ही कमजोरी लिंबू पाण्याने दूर होते. लिंबू पाणी कोमट प्यावं. यासाठी एक ग्लास पाणी कोमट करा आणि त्यात लिंबाचा रसा टाका. दिवसातून २ ते ३ वेळा या पाण्याचं सेवन करा.

काही इतर उपाय

- आल्याचा चहा प्यायल्याने जुलाबाची समस्या दूर होण्यास मदत मिळते. आल्यामध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात जे पोटाची समस्या दूर करतात.

- जुलाब लागल्यावर शरीरा हायड्रेटेड ठेवणं फार गरजेचं असतं. त्यामुळे भरपूर पाणी प्या किंवा ओआरएसचं पाणी प्या. 

- अ‍ॅपल व्हिनेगर जुलाबची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असतं. या अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. एक ग्लास पाण्यात २ चमचे अॅपल व्हिनेगर टाकून सेवन करू शकता.

- दालाचीनी सुद्धा ही समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरते. यात अ‍ॅंटी-मायक्रोबियल गुण असतात. एक दालचीनीची दांडी पाण्यात उकडून प्या. याने जुलाब आणि ब्लोटिंगची समस्या दूर होईल.

Web Title: Home remedies to get rid of loose motions diarrhea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.