Acidity दूर करण्याचे खास घरगुती उपाय, एकदा कराच मग बघा कमाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 10:21 AM2024-08-28T10:21:31+5:302024-08-28T10:27:36+5:30
Acidity Home Remedies : काही घरगुती उपाय करून तुम्ही तुमच्या पचनासंबंधी समस्या दूर करू शकता. हे उपाय तुम्ही मसाल्याचे किंवा तेलाचे पदार्थ खाल्ल्यावर झालेल्या डॅमेजला सुधारण्याचं काम करतात.
Acidity Home Remedies : काही खाल्ल्यानंतर गॅस आणि अॅसिडिटी होण्याची समस्या अनेकांना होते. ही समस्या कॉमन असली तरी यामुळे अनेकांना वैताग येतो. कामे व्यवस्थित होत नाहीत. अशात या समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. काही घरगुती उपाय करून तुम्ही तुमच्या पचनासंबंधी समस्या दूर करू शकता. हे उपाय तुम्ही मसाल्याचे किंवा तेलाचे पदार्थ खाल्ल्यावर झालेल्या डॅमेजला सुधारण्याचं काम करतात.
जेवणानंतर कोमट पाणी
जर तुम्हाला वाटत असेल की, मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर सकाळी तुम्हाला जुलाब होऊ नये तर जेवणानंतर कोमट पाणी नक्की प्यावं. कोमट पाण्याने पचनक्रिया वेगाने आणि सहजपणे होते.
चहा, कॉफी, ग्रीन टी फायदेशीर
जेवणानंतर चहा किंवा कॉफीचं सेवन करणं फायदेशीर असतं. यात फ्लेवोनोइड भरपूर प्रमाणात असतं, जे पचनक्रियेत ऑक्सीडेटिव लोडला संतुलित करण्यासाठी अॅंटीऑक्सीडेंट बनवतं.
दही फायदेशीर
आयुर्वेदात जेवण केल्यानंतर दही खाण्याचा सल्ला दिला जातो. दह्यातसोबत भाजलेलं जीरं पचनक्रियेला बूस्ट करतं. दह्यात असलेल्या प्रोबायोटिक्स लॅक्टोबेसिलस बॅक्टेरिया अॅसिडिटीला कमी करण्यासोबतच आतड्यांना अन्न पचवण्यास मदत करतं.
फायबरने पोट होतं साफ
जास्त तळलेले आणि भाजलेले पदार्थ खाल्ल्यानंतर हलकं आणि फायबरयुक्त जेवण पोटासाठी आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. फायबरयुक्त आहार पोटाची सफाई करण्यास मदत करतं. तसेच तेलकट खाल्ल्यानंतर पचनक्रियेचं झालेलं डॅमेजही कंट्रोल करतं. अशात दलिया आणि ओट्सचं सेवन करावं.
ड्रायफ्रूट्सचं करा सेवन
काजू, बदाम, पिस्ता, शेंगदाणे, मनुके, खजूर, सुपारीसारख्या ड्रायफ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळतं. याने पचनक्रिया मजबूत करण्यास मदत मिळते.
ओव्याचं पाणी
ओव्याचं पाणी जेवण केल्यानंतर सेवन करणं हा गॅस, अपचन, अॅसिडिटीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा घरगुती उपाय आहे. कोमट पाण्यात एक चमचा ओवा टाकून सेवन केल्यास पचनसंबंधी समस्या दूर होतात.