दातांच्या झिणझिण्यांमुळे त्रस्त आहात? 'या' घरगुती उपायांनी मिळेल त्वरित आराम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 12:03 PM2021-08-03T12:03:57+5:302021-08-03T12:07:40+5:30
दातांच्या हायपर सेन्सिटीव्हिटीचा त्रास अनेकांना असतो. असा त्रास होऊ लागल्यावर तुम्ही त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. कारण त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर तुम्हाला दातांच्या अन्य समस्या येऊ लागतात. दातांच्या झिणझिण्यांवर हे उपाय करा...
अनेकदा दात चांगले असूनही ते गरम किंवा थंड खाल्ल्यामुळे दुखतात. याचे कारण तुमच्या दातांचे नाजूक असणे. जर तुमच्या शरीरात कॅल्शिअमची कमी असेल तर तुमचे दातांना सतत झिणझिण्या बसत राहतात. म्हणजे तुम्ही काहीही खाल्ले तरी तुम्हाला त्रास होऊ लागतो. हायपर सेन्सिटीव्हिटीचा त्रास अनेकांना असतो. असा त्रास होऊ लागल्यावर तुम्ही त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. कारण त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर तुम्हाला दातांच्या अन्य समस्या येऊ लागतात. दातांच्या झिणझिण्यांवर हे उपाय करा...
लवंगाचे तेल
दातांना झिणझिण्या येत असतील तर दाताखाली लवंग धरा. यादरम्यान कोमट पाणीच प्या. आंबट आणि थंड पदार्थ खाणं टाळा. लवंगामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीएन्फ्लामेट्री गुणधर्म असतात. घरात लवंगाचे तेल असेल तर अजूनच उत्तम! दुखणा-या दातावर लवंगाच्या तेलात बुडवलेला कापूस ठेवा आणि लगेचच आराम मिळवा.
लसणाची पेस्ट
लसणाच्या दोन पाकळ्या सोलून घ्या. दुखत असलेल्या दातावर ठेवून ते लसूण चावा. त्याचा रस दाताचं दुखणं कमी करेल. यामध्ये एलिसीन नावाचे जे घटक असते ते तुमच्या दातांसाठी चांगले असते. तसेच लसूण दातांमधील जंतू कमी करण्यास मदत करते. तुम्ही लसणाची पेस्ट करूनही दातांवर चोळू शकता. त्यानंतर कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा.
आईल पुलिंग
ऑईल पुलिंगही दातांच्या झिणझिण्या थांबवण्याचा चांगला उपाय आहे. यासाठी तुम्ही लवंग किंवा नारळाच्या तेलाचा उपयोग करू शकता. नारळाच्या तेलात अँटीइन्फेमेंटरी गुण असतात ज्यामुळे दाताच्या झिणझिण्यांपासून आराम मिळतो. नारळाचे किंवा लवंगाचे तेल तोंडात टाका आणि २-३ मिनिटं त्याला तोंडात फिरवत रहा. त्यानंतर कोमट पाण्यात मीठ टाकून तुम्ही गुळण्या करा.