तुम्हाला मुंग्या येण्याची समस्या आहे? करा हे घरगुती उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 11:28 AM2018-08-02T11:28:36+5:302018-08-02T11:29:24+5:30

खरंतर जास्तवेळ एकाच पोजिशनमध्ये बसल्याने, किंवा उभे राहिल्याने असे होते. शरीराच्या ज्या भागात मुंग्या येतात त्या भागाल झटका दिल्यास किंवा तो अंग हलवल्यास मुंग्या जातात. चला जाणून घेऊ असे होण्याची कारणे...

Home remedies for Umbness causes, Know the symptoms | तुम्हाला मुंग्या येण्याची समस्या आहे? करा हे घरगुती उपाय 

तुम्हाला मुंग्या येण्याची समस्या आहे? करा हे घरगुती उपाय 

googlenewsNext

(Image Credit : www.livestrong.com)

अनेकदा काही लोकांना बसल्या बसल्या किंवा उभ्या उभ्या शरीराच्या काही अंगांना खासकरुन पायांना मुंग्या येतात. शरीराचा एक भार सुन्न होण्याला सर्वसामान्य भाषेत मुंग्या येणे असे म्हटले जाते. पण असे का होते हे अनेकांना माहीत नसतं. अशाप्रकारे अंगांना मुंग्या येणे सामान्य बाब आहे. हे कोणत्याही गंभीर रोगाचे लक्षण नाहीये. खरंतर जास्तवेळ एकाच पोजिशनमध्ये बसल्याने, किंवा उभे राहिल्याने असे होते. शरीराच्या ज्या भागात मुंग्या येतात त्या भागाल झटका दिल्यास किंवा तो अंग हलवल्यास मुंग्या जातात. चला जाणून घेऊ असे होण्याची कारणे...

का येतात मुंग्या?

शरीराच्या विविध अंगांना मुंग्या येणे सामान्य बाब आहे. साधारण हात, पाय किंवा खांद्यांला अधिकवेळा मुंग्या येतात. याचं कारण लेटताना, बसताना किंवा उभे राहताना शरीराच्या याच अंगांवर सर्वात जास्त प्रेशर पडतं. जेव्हा तुम्ही एकदा पोजिशनमध्ये बराचवेळ काम करता किंवा एकाच पोजिशनमध्ये थांबले असता तेव्हा मांसपेशी आणि रक्तवाहिन्या संथ होतात. त्यामुळे शरीराच्या काही भागांना मुंग्या येतात. जनरली जेव्हा रक्तप्रवाह थांबतो तेव्हा शरीराच्या काही अंगांना मुंग्या येतात. 

काय आहेत लक्षणे?

शरीराच्या काही अंगांना मुंग्या आल्यावर त्या अंगांबाबत आपल्याला काहीच जाणवत नाही. ते अंग आपल्याला नाहीत असे वाटायला लागते. अशात जर तुम्ही  त्या ज्या ठिकाणी मुंग्या आल्या आहेत त्या अंगांना झटका दिला तर तुम्ही सामान्य होऊ शकता. 

काय करावे यावर उपाय

लसूण आणि सूंठ

जर तुम्हाला नेहमी मुंग्या येण्याची समस्या होत असेल तर सकाळी नैसर्गिक विधी झाल्यावर सूंठाचे काही तुकडे किंवा लसणाच्या दोन कळ्या चाऊन खाव्यात. याने तुम्हाला आराम मिळेल. कारण या पदार्थांच्या सेवनामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. 

पिंपळाची पाने

पिंपळाचं झाड हे फार गुणकारी मानलं जातं. या झाडाच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे अॅंटी-ऑक्सीडेंट आणि मिनरल्स असतात. जर तुम्हाला नेहमीच ही समस्या होत असेल तर पिंपळाची ३-४ पाने मोहरीच्या तेलात उकळून घ्या. जेव्हा तुम्हाला मुंग्या येतील त्या जागेवर हे तेल लावा. 

तूप

तूप सुद्धा या समस्येवर एक चांगला उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी तूप थोडं कोमट करुन घ्या आणि ते तळपायाला लावा. तुम्हाला होत असलेली मुंग्या येण्याची समस्या दूर होईल.
 

Web Title: Home remedies for Umbness causes, Know the symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.