रात्री झोपण्यापूर्वी 'ही' कामे केल्यास दातांचा पिवळेपणा होईल चटकन दूर, दात होतील पांढरेशुभ्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 01:49 PM2021-08-08T13:49:07+5:302021-08-08T13:49:40+5:30

झोपेच्या आधी खालील कामे केल्याने तुमचे दात हिऱ्यासारखे पांढरे होतील. दात पांढरे करण्यासाठी हे अगदी सोपे उपाय आहेत.

home remedies to whiten your yellow teeth. do these remedies before sleeping in night and your teeth will be white and clean | रात्री झोपण्यापूर्वी 'ही' कामे केल्यास दातांचा पिवळेपणा होईल चटकन दूर, दात होतील पांढरेशुभ्र

रात्री झोपण्यापूर्वी 'ही' कामे केल्यास दातांचा पिवळेपणा होईल चटकन दूर, दात होतील पांढरेशुभ्र

googlenewsNext

जीवनशैलीतील वाईट सवयींमुळे आपल्या दातांचे आरोग्य बिघडते. यामुळे आपल्या दातांचा रंग पिवळा होतो. पिवळ्या दातांमुळे तुमचे हास्य फार वाईट दिसते. याचा तुमच्या व्यक्तीमत्वावर परिणाम होतो. पण झोपेच्या आधी खालील काम केल्याने तुमचे दात हिऱ्यासारखे पांढरे होतील. दात पांढरे करण्यासाठी हे अगदी सोपे उपाय आहेत.

केळीचे साल :- रोज रात्री झोपायच्या आधी केळ्याच्या सालीचा आतला भाग दातांवर २-३ मिनिटे घासा. त्यानंतर कोमट पाण्याने दात धुवा. केळीच्या सालीमध्ये असलेली  खनिजे आणि पोटॅशियम दातांची घाण साफ करतात. लक्षात ठेवा की केळीची साल जास्त जोराने घासू नका, यामुळे हिरड्यांमध्ये वेदना होऊ शकते.

बेकिंग सोडा आणि लिंबू :- दात स्वच्छ करण्यासाठी १ चमचा बेकिंग सोड्यामध्ये १ चमचा लिंबाचा रस मिसळून २ ते ३ मिनिटे दातांवर लावून ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा आणि झोपा. आठवड्यातून दोन ते तीन रात्री दात स्वच्छ करण्यासाठी हा घरगुती उपाय करा. बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस दातांवरील डाग साफ करू शकतो.

हळद :- रोज रात्री झोपायच्या आधी हळद पावडरने ब्रश करा. २ ते ३ मिनिटांनी माऊथवॉश करा. दातांमधून पिवळेपणा दूर करण्यासाठी ही अगदी सोपी पद्धत आहे.

खोबरेल तेल :- नारळाचे तेल आपल्या बोटांवर लावा आणि दररोज रात्री दातांवर घासून घ्या. दातांची घाण साफ करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. यानंतर तोंड नीट धुवा.

कडुलिंब :- दातांमध्ये घाण आणि जीवाणू देखील जमा होतात. हे दूर करण्यासाठी तुम्ही ४ ते ५ कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून घ्या आणि नंतर स्वच्छ धुवा. त्यानंतर ब्रश केल्यानंतर झोपा. रोज रात्री असे केल्याने तुमच्या दातांचा रंग साफ होईल.

Web Title: home remedies to whiten your yellow teeth. do these remedies before sleeping in night and your teeth will be white and clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.