​हिवाळ्यातील आजारांवर घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2016 05:16 PM2016-11-05T17:16:00+5:302016-11-05T17:16:00+5:30

उन्हाळा आणि पावसाळ्याचा आनंद घेतल्यानंतर सर्वांना हवाहवासा वाटणाऱ्या हिवाळ्याची नुकतीच चाहूल लागली आहे. हिवाळ्यातील हुडहुडी भरायला लावणाऱ्या गुलाबी थंडीत स्वेटर, मफलर तसेच लहान मुलांच्या कानटोप्या, पायमोजे बाहेर येऊ लागतात.

Home remedies for winter sickness! | ​हिवाळ्यातील आजारांवर घरगुती उपाय!

​हिवाळ्यातील आजारांवर घरगुती उपाय!

googlenewsNext
ong>-Ravindra More

उन्हाळा आणि पावसाळ्याचा आनंद घेतल्यानंतर सर्वांना हवाहवासा वाटणाऱ्या हिवाळ्याची नुकतीच चाहूल लागली आहे. हिवाळ्यातील हुडहुडी भरायला लावणाऱ्या गुलाबी थंडीत स्वेटर, मफलर तसेच लहान मुलांच्या कानटोप्या, पायमोजे बाहेर येऊ लागतात. वातावरणातील गारव्यामुळे इतर ऋतूंच्या तुलनेने हिवाळ्यात पचनशक्ती वाढून भूक चांगली लागते. म्हणून या काळात समतोल आहार घ्यावा आणि आरोग्य सुदृढ ठेवावे. हिवाळा आरोग्याच्या दृष्टीने जरी चांगला मानला गेला आहे, तरी या ऋतूत बरेच जुनाट आजार डोके वर काढतात. आजच्या सदरात अशा आजारांवर घरगुती काय उपाययोजना करावी याबाबत जाणून घेऊया...

या ऋतूत शरीरातील रुक्षता वाढते म्हणून आहारात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण वाढवावे. त्यात विशेषत्त्वाने काजू, बदाम, अंजीर, आक्रोड, खारीक, खोबरे, बेदाणे इत्यादी पदार्थांचं सेवन आपल्या प्रकृतीनुसार वाढवावे. तसेच डिंक, सुकामेवा, बेसन, मेथी इत्यादींचे साजूक तुपात तळलेले लाडू शरीराला बलवर्धक ठरतात. हिवाळ्यात दिवसाच्या तुलनेने रात्र मोठी असल्याने वारंवार भूक लागते, त्यामुळे सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्रीचं जेवण गरमागरम आणि पौष्टिक घ्यावं. या काळात सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळे, फळांचा रस सेवन करावा.  



त्वचेच्या समस्या 
हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलाचा परिणाम त्वचेवर होतो. रात्री गारवा आणि दिवसा कडक ऊन असते. त्यामुळे परिणाम होऊन त्वचेच्या समस्या निर्माण होण्यास सुरूवात होते. अशा वातावणामुळे त्वचेतल्या तैलग्रंथी निष्क्रीय होऊन त्वचा निस्तेज आणि रखरखीत बनते. चेहऱ्यावर सुरकुत्या, त्वचा फाटणे, ओठ फुटणे अशा तक्रारी वाढतात. अंघोळीनंतर क्रीम ऐवजी खोबरेल तेल, तिळाचे तेल, साय, लोणी तसेच तुपाचा वापर करु शकता. त्वचेची कांती स्निग्धता टिकवून ठेवण्यासाठी आहारात मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सलादचे प्रमाण वाढवावे. चेहरा सतेज होण्यासाठी पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्यावर लावावा. तसेच चेहऱ्याचा काळवंडलेपणा घालविण्यासाठी संत्र्याचा रस, संत्र्याची साल, काकडीचा रस चेहºयावर लावावा. साय किंवा तुपात चंदन टाकून रात्री झोपताना मालिश केल्यास त्वचेला तेज प्राप्त होते.    


दमा
ज्यांना दम्याचा त्रास आहे, त्यांना हिवाळ्यात छातीत कफ साचल्याने खूप त्रास होत असतो. म्हणून या ऋतूत अशा व्यक्तींनी दही, ताक, दूध, मिठाई , थंड पाणी, आईसक्रीम, कोल्ड टी तसेच कोल्ड कॉफी तसेच विविध शीतपेये अजिबात घेऊ नयेत. त्रास अधिक होऊ नये म्हणून पाणी सहसा कोमट करून प्यावे तसेच सुंठ आणि मध किंवा आल्याचा रस आणि मध हे मिश्रण घ्यावे. वमन केल्यानेही दम्याचा त्रास कमी होतो. तसेच रात्री झोपताना आणि सकाळी अंघोळीपूर्वी छातीला तीळतेल, महानारायण तेल लावून दररोज शेक घेतल्यास छातीत साचलेला कफ मोकळा होतो. रात्री झोपताना किंवा सकाळी दम्याचा त्रास असणाºयांनी २ ते ३ कप पाणी घेऊन त्यात तुळस, अडुळशाची प्रत्येकी दोन पाने टाकावी आणि एक कप काढा राहील अशा रितीने उकळून कोमट काढा घ्यावा. तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्राणायाम, कपालभारती केल्यास नक्कीच फायदा होतो. 


हातापायाच्या तळव्यांना भेगा

हिवाळ्यात शरीरात रुक्षता येत असल्याने हातापायांच्या तळव्यांना भेगा पडतात. बºयाचदा या भेगातून रक्तही येतं आणि खूप वेदनाही होतात. या ऋतून आपण रुक्षान्नाचे अतिसेवन करत असल्याने भेगा पडण्याचा आजार वाढतो.  हा त्रास वाढू नये यासाठी आहारात साजूक तुपाचा समावेश करावा. आहारात दूध, तुपासारखे स्निग्ध पदार्थ वाढवावेत. लोणचे, मिरचीचा ठेचा तसेच अतितिखट पदार्थ कटाक्षाने टाळावेत. जागरणामुळेही शरीरात रुक्षता वाढत असल्याने रात्री जागरण करणं टाळावं. रात्री झोपताना भेगांना साजूक तूप लावावे. चंदन, लाख, ज्येष्ठमध त्याचप्रमाणे तज्ज्ञांच्या सल्ल्याने विविध औषधी तेल भेगांवर लावावीत. ज्येष्ठमध साजूक तुपात टाकून पिल्यामुळंही भेगांचा त्रास कमी होण्यास मदत होते.  


सांधेदुखी
विशेषत: हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास जास्त सतावतो. या काळात अशा लोकांनी विशेष काळजी घ्यावी. यासाठी सांध्यांना थंड हवा लागू देऊ नये त्याचप्रमाणे पायांना, हातांना मोजे वापरावेत. थंड पाण्यात काम करणं टाळावं. शिळं आणि थंड अन्न घेऊ नये. बटाटे, उसळी, ब्रेड तसेच बेकरीचे पदार्थ, डाळी आणि डाळींच्या पीठाचे पदार्थ टाळावेत. मांसाहार पूर्णत: वर्ज्य करावा. गरम, ताजे अन्न घ्यावे. थंड पाण्यापेक्षा कोमट पाणी प्यावं. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यानी थंडीच्या दिवसांत अतिश्रम करणं टाळावं. रात्री झोपताना सांध्यांना एरंडेल तेलाने मालिश करावं. विविध प्रकारचे गुग्गुळ, दशमुळांचा काढा तसेच इतर वनौषधींचा उपयोग वैद्यकीय सल्याने केल्यास सांधेदुखीचा त्रास आपण टाळू शकतो.

Web Title: Home remedies for winter sickness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.