गॅस आणि पोट फुगण्याची समस्या 'या' घरगुती उपायांनी झटपट करा दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 12:43 PM2019-10-31T12:43:15+5:302019-10-31T12:50:15+5:30

पोटात गॅस तयार होणे ही एक सामान्य बाब आहे. पण अनेकदा यामुळे छातीत दुखणं सुरू होतं. नंतर ही गॅसची समस्या इतकी वाढते की, उलट्याही होऊ लागतात.

Home remedy for gas and gas pain causes | गॅस आणि पोट फुगण्याची समस्या 'या' घरगुती उपायांनी झटपट करा दूर!

गॅस आणि पोट फुगण्याची समस्या 'या' घरगुती उपायांनी झटपट करा दूर!

Next

(Image Credit : womenshealth.gov)

पोटात गॅस तयार होणे ही एक सामान्य बाब आहे. पण अनेकदा यामुळे छातीत दुखणं सुरू होतं. नंतर ही गॅसची समस्या इतकी वाढते की, उलट्याही होऊ लागतात. तुम्हालाही गॅसची अशीच समस्या असेल तर काही घरगुती उपयांनी तुम्ही दूर करू शकता. 

पोटात गॅस झाल्यावर पोट फुगतं आणि पचनासंबंधी समस्या निर्माण होते. जर तुम्हाला ही समस्या नेहमी होत असेल तर अजिबात याकडे दुर्लक्ष करू नका. कारण सतत होणारी ही समस्या तुमच्या पोटासाठी घातक ठरू शकते. पुढे जाऊन तुम्हाला एखादा गंभीर आजारही होऊ शकतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही घरगुती टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही ही समस्या दूर करू शकता.

(Image Credit : collective-evolution.com)

१) जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर रोज अनोशा पोटी एक चमचा बेकिंग सोड्यात लिंबाचा रस मिश्रित करून सेवन करा. हे प्यायल्याने तुमची गॅसची समस्या काही मिनिटातच दूर होईल. 

(Image Credit : npr.org)

२) हींगाचा वापर वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. गॅसची समस्या दूर करण्यासाठीही हींग फायदेशीर ठरतो. एक ग्लास गरम  पाण्यात हींग टाकून तुम्ही सेवन करू शकता. याने तुमची गॅसची समस्या दूर होईल. असं तुम्ही दिवसातून दोन वेळा करू शकता.

३) काळे मिरे सुद्धा गॅस दूर पळवण्यासाठी फायदेशीर ठरतात. काळ्या मिऱ्यांचं सेवन केल्याने केवळ गॅसची समस्याच दूर होणार नाही तर तुमची पचनक्रियाही चांगली होईल. पोटात गॅस झाल्यावर तुम्ही दुधात काळे मिरे टाकून सेवन करू शकता.

४) गॅसची समस्या दूर करण्यासाठी दालचिनी पाण्यात उकडून घ्या आणि पाणी थंड होऊ द्या. रोज सकाळी अनोशा पोटी दालचिनीचं पाणी सेवन करा. जर याची टेस्ट तुम्हाला पसंत नसेल तर त्यात थोडं मध टाका. 

५) लसणाचे आरोग्याला होणारे फायदे तुम्हाला चांगलेच माहीत असतील. तशीच गॅसची समस्या दूर करण्यासाठीही लसणाचा फायदा होतो. गॅसची समस्या दूर करण्यासाठी लसूण, जिरं आणि धणे पाण्यात उकडून घ्या. हे पाणी रोज दिवसातून दोनदा सेवन करा. याने तुमची गॅसची समस्या लगेच दूर होईल. 


Web Title: Home remedy for gas and gas pain causes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.