डोळे चांगले ठेवण्यासाठी वापरा 'हे' घरगुती उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 09:58 AM2020-01-06T09:58:35+5:302020-01-06T09:59:44+5:30
सध्याच्या काळात खूप लोकांना चष्मा लागलेला आपल्याला दिसून येतो.
सध्याच्या काळात खूप लोकांना चष्मा लागलेला आपल्याला दिसून येतो. लहान, मोठ्या तसंच मध्यम वयाच्या लोकांमध्ये सुद्धा ही समस्या सर्वाधिक जाणवते. वयामानानुसार डोळे कमजोर होणे किंवा मोबाईल, लॅपटॉप स्क्रीनचा अतिवापर करणे. यांमुळे चष्मा वापरत असलेल्या लोकांच्या प्रमाणात वाढ होत आहे. काही लोकांना चष्मा लावायला जराही आवडत नाही तरी त्यांना समस्या जाणवल्यामुळे त्यांना नंबरचा चष्मा लावावाच लागतो. जर तुम्हाला सुद्धा चष्मा असेल आणि तुम्हाला तो वापरण्यातची जराही ईच्छा नसेल तर आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही चष्मा लावणं सोडू शकता . तसंच ज्यांना चष्मा नसेल असे लोकं आपले डोळे अधिक चांगले ठेवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत डोळ्यांसाठी फायदेशीर असलेले घरगुची उपाय.
कोथिंबिरीचा रस
कोथिंबिरीच्या रसाचा वापर करून तुम्ही डोळ्यांचे सौंदर्य परत आणू शकता. आत्तापर्यंत कोथिंबिरीचे अनेक फायदे तुम्हाला माहित असतील पण जर जेवणात वापर करत असताना याच कोथिंबिरीचा वापर तुम्ही वेगळ्या पद्धतीने केलात तर डोळ्यात सुधारणा होईल. यासाठी ताज्या कोथिंबिरीचा रस काढून घ्यावा. हा रस दररोज डोळ्यात घालून डोळे १० मिनिट बंद करून ठेवावेत. असे केल्यास डोळ्यांच्या समस्येत सुधारणा दिसून येईल.
गाजराचा रस
गाजर हे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायद्याचे असते. सध्या हिवाळा सुरू असल्यामुळे गाजरं बाजारात सहज मिळतात. याच गाजरांचा वापर तुम्ही डोळ्यांसाठीसुद्धा करू शकता. डोळ्यांच्या दृष्टीने महत्वाचे असे आहे. गाजरात व्हिटामीन ए असतं. तसंच दररोज सकाळी गाजराचा रस प्यायल्यास डोळ्यांसाठी फायद्याचं ठरेल.
त्रिफळा पावडर
एक टिस्पून त्रिफळा पाऊडर एक ग्लास पाण्यात मिसळा आणि रात्रभर हे असंच राहू द्या. पुढच्या दिवशी सकाळी या पाण्याला गाळून घ्या आणि या पाण्याने आपले डोळे धुवा. डोळे धुवत असताना पाणी साफ असेल याची खबरदारी बाळगा. एक महिना हा प्रयोग केल्यास डोळ्यांमध्ये फरक दिसून येईल.
राईचे तेल
खाण्यासोबतच राईच्या तेलाचा वापर केसांसाठी सुद्दा केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का डोळे चांगले राहण्यासाठी राईचे तेल फायदेशीर ठरते. यासाठी राईचे तेल गरम करून दररोज रात्री पायांच्या तळव्यांना घासा. राईचं तेल तळपायांना लावून मसाज केल्यास डोळे चांगले राहतील.