सायनसची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 01:35 PM2018-08-13T13:35:40+5:302018-08-13T13:35:58+5:30

वातावरणातील बदल किंवा वाढतं प्रदुषण यांमुळे अनेक लोकांना सायनसची समस्या उद्भवते. वातावरणातील बदलांमुळे सायनसची समस्या वाढण्याचा धोका आणखी वाढतो.

This home remedy removes the problem of sinus | सायनसची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय!

सायनसची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय!

googlenewsNext

वातावरणातील बदल किंवा वाढतं प्रदुषण यांमुळे अनेक लोकांना सायनसची समस्या उद्भवते. वातावरणातील बदलांमुळे सायनसची समस्या वाढण्याचा धोका आणखी वाढतो. सायनस म्हणजे शरीराला झालेलं एक प्रकारचं इन्फेक्शनच असतं. सायनसमुळे नाकाचं हाड, गाल आणि डोळेही दुखू लागतात. जाणून घेऊयात असे काही घरगुती उपाय ज्यांमुळे सायनसच्या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी तुम्हाला मदत होईल. 

1. सायनसपासून सुटका करून घेण्यासाठी गरम पाण्याची वाफ घ्या. त्यामुळे नाकात आणि गळ्यामध्ये जमलेली धूळ आणि मातीचे कण साफ होऊन जातात. यामुळे सायनसच्या समस्येपासून सुटका होते. गरम पाण्याची वाफ घेताना त्यामध्ये निलगिरीच्या तेलाचे काही थेंब टाकणं फायदेशीर ठरतं. 

2. सायनसचा त्रास होत असेल तर नेहमी थोड्याशा शिजवलेल्या भाज्यांचं सूप , सफरचंद, डाळी आणि भाज्यांचं सेवन करा. याव्यतिरिक्त कफ तयार होण्यास मदत करणारे पदार्थ म्हणजे, चॉकलेट, अंडं, साखर आणि मैदा यांसारख्या पदार्थांचं सेवन करणं टाळा. तसेच जास्त तेलकट पदार्थांचं सेवन केल्यामुळेही सायनसचा त्रास होऊ शकतो. यावर भरपूरप्रमाणात पाणी पिणं फायदेशीर ठरतं. 

3. सायनसवर कांदा आणि लसणाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात सल्फर असतं. जे सर्दी , खोकला आणि सायनसच्या इन्फेक्शनवर गुणकारी ठरतं. तसेच कांद्याचा दर्प सायनसवर लाभदायक ठरतो.  त्यासाठी कांदा आणि लसून पाण्यामध्ये उकळून त्या पाण्याची वाफ घ्या. असं केल्यामुळे तुम्हाला सायनसच्या त्रासापासून आराम मिळेल. 

4. गरम पाण्यामध्ये पुदीन्याच्या  पानांच्या रसाचे काही थेंब टाकून त्याची वाफ घ्या. आराम मिळेल.

5. मेथीचे काही दाणे गरम पाण्यामध्ये उकळून प्यायल्याने सायनसचे इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते. 

6. जर सायनसचा जास्त त्रास होत असेल तर दररोज ऑलिव्ह ऑईलने नाकावर मसाज करा. सायनसमुळे होणारा त्रास दूर होईल. 

Web Title: This home remedy removes the problem of sinus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.