घरात वर्कआउट करणं जिममध्ये एक्सरसाइज करण्याइतकच फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 10:51 AM2019-06-26T10:51:55+5:302019-06-26T10:57:06+5:30
अलिकडे जिमला जाण्याचा ट्रेन्ड फारच वाढलेला बघायला मिळतो. अनेकजण जिमची फी तर भरतात पण जिमला जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. तुम्ही अशाच लोकांपैकी एक असाल तर फार चिंता करण्याची गरज नाही.
(Image Credit : health.usnews.com)
अलिकडे जिमला जाण्याचा ट्रेन्ड फारच वाढलेला बघायला मिळतो. अनेकजण जिमची फी तर भरतात पण जिमला जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. तुम्ही अशाच लोकांपैकी एक असाल तर फार चिंता करण्याची गरज नाही. अभ्यासकांनुसार, घरीच वर्कआउट करणेही जिममध्ये एक्सरसाइज करण्याइतकंच फायदेशीर ठरतं. इतकेच नाही तर घरात वर्कआउट केल्याने केवळ तुमचे पैसेच वाचतात असं नाही तर वेळही वाचतो.
होम बेस्ड एक्सरसाइजचा काय होतो प्रभाव?
द जर्नल ऑफ फिजिऑलॉजी नावाच्या मॅगझिनमध्ये या रिसर्चचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहेत. या रिसर्चमध्ये घरीच हाय इंटेंसिटी इंटरवल ट्रेनिंग म्हणजेच HIIT प्रोग्रामची टेस्ट केली गेली आणि खासकरून हेही बघण्यात आलं की, याप्रकारच्या होम बेस्ड प्रोग्रामचा लठ्ठपणाने शिकार असलेल्या व्यक्ती, ज्यांना हृदयरोगांचा अधिक धोका असतो, त्यांच्यावर काय प्रभाव पडतो.
(Image Credit : Metro)
लठ्ठपणाचे शिकार असलेल्या ३२ लोकांची १२ आठवडे एक्सरसाइज
लिव्हरपूल जॉन मूर्स युनिव्हर्सिटी आणि या रिसर्चचे लेखक सॅम स्कॉट म्हणाले की, होम बेस्ट HIIT प्रोग्रामशी संबंधित एक्सरसाइजमुळे केवळ वेळच नाही तर पैशांची देखील बचत होते. तसेच एक्सरसाइजमध्ये फार सक्रिय नसलेल्यांचा इंटरेस्ट देखील वाढतो. याने लोकांच्या आरोग्यावर चांगला परिणामही होतो.
(Image Credit : www.self.com)
या रिसर्चसाठी लठ्ठपणाचे शिकार असलेल्या ३२ लोकांना १२ आठवडे एक्सरसाइजचा प्रोग्राम करण्यास सांगण्यात आले. या लोकांच्या आरोग्यासंबंधी इतरही टेस्टही करण्यात आल्याय ज्यात बॉडी कॉम्पोझिशन, हृदयरोगाचा धोका आणि शरीरात ग्लूकोज रेग्युलेट करण्याची क्षमता यांचा समावेश होता.
३ वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागून निष्कर्ष बघण्यात आले
(Image Credit : www.self.com)
या ३२ लोकांना ३ वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये विभागण्यात आलं. पहिल्या ग्रुपमध्ये ते होते ज्यांनी लॅब बेस्ड सायक्लिंग HIIT प्रोग्राम केला, दुसऱ्यात ते होते ज्यांनी यूके सरकारकडून तयार करण्यात आलेला १५० मिनिटांचा मॉडरेट इंटेंसिटी एक्सरसाइज प्रोग्राम करण्यात आला आणि तिसऱ्यात ते होते ज्यांनी होम बेस्ड HIIT प्रोग्रामशी संबंधित सोप्या बॉडी वेट एक्सरसाइज केल्यात. यात त्यांनी कोणत्याही साहित्यांचा वापर केला नाही. अभ्यासकांना आढळलं की, होम बेस्ड HIIT प्रोग्राम सुद्धा तेवढाच लठ्ठपणाने हैराण असलेल्या व्यक्तींच्या फिटनेससाठी प्रभावी आहे, जेवढ्या इतर दोन एक्सरसाइज आहेत.