पावसामुळे रनिंग करणं जमत नसेल तर घरीच ट्राय करा 'हे' व्यायाम, मिळतील सारखेच फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 10:31 AM2024-08-03T10:31:09+5:302024-08-03T10:31:33+5:30
Home Workout Tips : घरात केलेल्या या व्यायामांनी सुद्धा धावण्या-चालण्याइतके फायदे मिळतात. या व्यायामांना कार्डिओ कॅटेगरीत टाकलं जातं.
Home Workout Tips : रोज धावायला जाणं ही अनेकांची आवडत असते. धावणं हा एक संपूर्ण व्यायाम मानला जातो. वजन कमी करण्यासोबतच हृदय निरोगी ठेवण्यास याने मदत मिळते. पण पावसाळ्यात बरेच लोक बाहेर धावण्यासाठी जाऊ शकत नाहीत. सोबतच सगळीकडे चिखल, पाणी असल्याने घसरून पडण्याची भीती देखील असते. अशात तुम्ही घरातच अशा काही व्यायाम करू शकता. घरात केलेल्या या व्यायामांनी सुद्धा धावण्या-चालण्याइतके फायदे मिळतात. या व्यायामांना कार्डिओ कॅटेगरीत टाकलं जातं. आज आम्ही अशाच काही व्यायामांबाबत तुम्हाला सांगणार आहोत.
स्ट्रेचिंग करू शकता
घर कितीही लहान असलं तरी तुम्ही निदान हात-पाय चारही बाजूने स्ट्रेच करू शकता. तशी तर स्ट्रेचिंग कोणतीही एक्सरसाइज करण्याआधी केली जाते. पण घरी राहत असाल तर तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता. जर घरात लहान मुले असतील तर त्यांच्यासोबत स्ट्रेचिंग करण्यात तुम्हाला जास्त आनंद येईल. ही एक्सरसाइज करून तुमचा आळस लगेच दूर होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.
डान्स करा
जर तुम्हाला एक्सरसाइज करण्याचा कंटाळा येत असेल किंवा एक्सरसाइज करायचीच नसेल तर तुम्ही घरातील लहान मुलांसोबत दिवसातून 20 ते 30 मिनिटे आवडत्या गाण्यावर डान्स करू शकता. डान्स करणं ही सर्वात बेस्ट एक्सरसाइज मानली जाते. कारण इतर एक्सरसाइजमध्ये तुम्ही ठराविक अवयवांची हालचाल करता, पण डान्सिंगने तुमच्या संपूर्ण शरीराची एक्सरसाइझ होते.
स्पॉट रनिंग
धावणं आरोग्यसाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला बाहेर रनिंगला जायला मिळत नसेल तर घरीही तुम्ही रनिंग करू शकता. तुम्ही घरात स्पॉट रनिंग करू शकता. स्पॉट रनिंग म्हणजे एकाच जागेवर रनिंग करणे. स्पॉट रनिंगचा फायदा हा आहे की, याने ब्लड सर्कुलेशन वाढतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. तसेच स्पॉट रनिंगने मांड्या, पोट आणि कंबरेवरची चरबी कमी होते.
स्व्कॉट्स
स्व्कॉट्स सुद्धा तुम्ही घरीच छोट्याशा जागेत करू शकता. ही घरी करण्यासाठीची सर्वात चांगली एक्सरसाइज मानली जाते. याने तुम्हाला मांड्या आणि गुडघ्यांना फायदा मिळतो. त्यासोबत पोटावरील चरबी कमी करण्यासही ही एक्सरसाइज मदत करते. या एक्सरसाइजचे तुम्ही 15 चे 3 सेट मारू शकता. याने पोटाचा घेर कमी होईल.