घाम आणि घामोळ्यांनी हैराण असाल, तर घरच्याघरी 'या' थंडगार पेयांनी नेहमी कूल रहा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 12:41 PM2020-04-19T12:41:49+5:302020-04-19T12:42:50+5:30
जास्त मेहनत न करता शरीर डायड्रेट ठेवण्यासाठी ही पेयं फायदेशीर ठरतील.
(image credit- deccan chronicle)
उन्हाळा सुरू झाल्यामुळे दिवसेंदिवस गरमीचं वातावरण वाढत चाललं आहे. त्यामुळे शरीराची उष्णता वाढते. गरमीपासून शरीराचं रक्षण करायचं असेल तर आरोग्यासंबंधी आणि आहारासंबंधी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. विविध ठिकाणी गरमीच्या वातावरणात फ्रुट ज्यूस, ड्रिंकसं सेवन केलं जातं. आज आम्ही तुम्हाला घरच्याघरी कोणती पेय तयार करता येतील याबाबत सांगणार आहोत. जेणेकरून जास्त मेहनत न करता तुम्हाला शरीर डायड्रेट ठेवता येईल.
लिंबू पाणी
लिंबू पाणी दिवसातून दोनवेळा प्यायल्याने सुद्धा तुमचं शरीर हायड्रेट होईल. लिंबू पाणी हे नैसर्गिक एनर्जी ड्रिंक आहे. जे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी समांतर ठेवतं. नियमित लिंबू पाणी प्यायल्यानं त्वचेची pH पातळी एकसमान राहते. लिंबू पाणी शरीरातील नको असलेले घटक बाहेर टाकण्यासाठी मदत करतं आणि शरीर आतून स्वच्छ ठेवण्यास मदत करत.
दही
उन्हाळ्यात अनेक घरांमध्ये ताक प्यायलं जातं. दह्यामध्ये मीठ, जिरा पावडर आणि चवीनुसार हिंग घालून ब्लेंडरमध्ये चांगल्या पद्धतीने ब्लेंड करुन घ्या. नंतर यामध्ये बर्फ घालून या थंडगार पेयाचा आस्वाद घ्या. या दही शेकमुळे आपल्या पोटातील आग आणि पित्त दूर होते.
कैरीचं पन्हं
कैरीच पन्हे बनवण्यासाठी सगळ्यात आधी कैरीला चांगल्या पद्धतीने सोलून त्यामधील कोय काढुन त्याला गरम पाण्यात उकळुन घ्या. त्यानंतर यामध्ये काळ मीठ, चाट मसाला, पुदिना आणि साखर घालुन मिक्सर मध्ये त्याचा ज्युस करुन, एका ग्लासात बर्फाचे तुकडे घालून कैरी पन्हं प्या.
पुदीना रस
पुदिन्याचं सरबत हे ऊन्हाळ्यात आपल्या शरीराला डिहाइड्रेशन वाचवतो, हे सरबत बनवताना सगळ्यात आधी मिक्सरमध्ये पुदीना, साखर, मध, काळ मीठ, मिरपूड आणि जीरा पावडर घालून चांगल्या पद्धतीने वाटुन घ्या. या तयार झालेल्या पेस्टला कमी पाण्यात मिक्स करा. पुदिन्याचा रस तयार आहे.
कोरफडीचा रस
कोरफडाच्या पानांचा गर काढताना, त्यावरील पिवळ्या रंगाचा थर काढुन टाका कारण यामुळे कोरफड रस हा कडवट होण्याची शक्यता असते. कोरफडचा पांढरा गर काढून घेतल्यावर, त्याला मिक्सरमध्ये चांगल्यापद्धतीने वाटून घ्यावा. आणि त्यानंतर तुमच्या आवडीनुसार चाट मसाला किंवा मीठ घालावे. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून टाकण्यासाठी तसंच एलर्जी मिटवण्यासाठी हा रस फायदेशीर ठरतो.