होमिओपेथीच्या 'या' औषधाने कोरोनापासून होतो बचाव? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 06:42 PM2020-05-19T18:42:45+5:302020-05-19T19:00:46+5:30

CoronaVirus latest News : कोरोनाच्या महामारीचा प्रसार वाढत असताना आता कॅमफोरा 1  या ओषधाने कोरोनाचा धोका टळू शकतो का याबाबत सत्यता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Homeopathy medicine camphora m can treat or used as adjuvant against coronavirus myb | होमिओपेथीच्या 'या' औषधाने कोरोनापासून होतो बचाव? जाणून घ्या सत्य

होमिओपेथीच्या 'या' औषधाने कोरोनापासून होतो बचाव? जाणून घ्या सत्य

googlenewsNext

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आत्तापर्यंत कोणतीही लस किंवा औषध शोधण्यात आलेलं नाही. शास्त्रज्ञांच्या औषधांवर आणि लसींवर वेगवेगळ्या चाचण्या सुरू आहेत.  अलिकडे भारतीय डॉक्टरांनी कोरोनाला रोखण्यासाठी होमिओपेथी औषधांवर परिक्षण करायला हवं अशी मागणी केली होती. काही दिवसांनी Central Drugs Standard Control Organisation ने या प्रयोगासाठी मंजूरी दिली.  कोरोनाच्या महामारीचा प्रसार वाढत असताना आता कॅमफोरा 1  या ओषधाने कोरोनाचा धोका टळू शकतो का  याबाबत सत्यता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

अशी झाली सुरूवात

हा दावा करण्यामागे बजाज ऑटोचे मॅनेजिंग डायरेक्टर यांच म्हणणं होतं. की, पुण्यात ३ लाख लोकांना ही औषधं देण्यात आली होती.  तसंच त्या लोकांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसून आली नाही. सीएनबीसीला दिलेल्या माहितीनुसार  भारतातील डॉक्टर संकरन यांनी इराण मधील आपल्या डॉक्टर मित्राला  कोरोना रुग्णांना होमिओपेथीचे औषध कॅमफोर एम 1 देण्याचा सल्ला दिला.  या औषधामुळे सकारात्मक परिणाम दिसून आले. रुग्णांची रिकव्हरी जलद गतीने झाली. 

पोलीसांनाही औषधं दिली जात आहेत.

त्यानंतर सोशल मीडियावर या औषधांचा सल्ला देण्यात आला. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार झारखंडमध्ये CRPF  जवानांना सुद्धा कॅमफोरा एम 1  हे औषध दिलं जात आहे. त्यासोबतच रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय म्हणजेच हळदीच्या दुधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जात आहे. आयुष मंत्रालयाच्या सांगण्यानुसार महाराष्ट्रातील पोलिसांना सुद्धा होमियोपेथीची औषधं देण्यात आली आहेत.  इतर माध्यमांनी  दिलेल्या माहितीनुसार ही औषधं कोरोनाचे उपचार नसून शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आणि शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. 

सेंट्रल काउंसिल फॉर रिसर्च इन होमिओपेथीद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार कॅमफोरा हे औषध व्हायरसच्या उपचारांवर साहाय्यकाप्रमाणे काम करत आहेत. याशिवाय इराणमध्ये ज्या लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं होतं.  त्यांना हॉमिओपेथी औषधांसोबतच एंटी व्हायरस औषधंसुद्धा देण्यात आली होती.  त्यामुळे कोरोनाचे रुग्ण  कॅमफोरा या औषधांमुळे बरे झाले असं म्हणता येत नाही, असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.

Central Drugs Standard Control Organisation ने दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांनी स्वतःला क्वारंटाईन केलं आहे. ते लोक या औषधाचा वापर करू शकतात.  याशिवाय कोरोनापासून बचाव करण्यासाठी  आयुष मंत्रालयाने Arsenicum Album- या ओषधाचं सेवन  करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी तीन दिवस लागोपाठ समप्रमाणात हे औषध घ्यायला हवं. महिनाभरानंतर या डोसची पुनरावृत्ती करायला हवी. यामुळे  कोरोना व्हायरसपासून बचाव केला जाऊ शकतो. हॉमिओपेथी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ही औषध एंटीबॉडी तयार  करत नसून शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे रुग्णाला कोरोनाचं संक्रमण होऊ शकत नाही.  संक्रमण झाल्यास लवकर आजारातून बाहेर येण्यास मदत होईल.

एलोपेथिक डॉक्टरांच्यामते सामान्य लक्षणं दिसत असलेले कोरोना रुग्ण आपोआप बरे होतात.  पण होमिओपेथीची औषधं रुग्णांनी सुरू ठेवल्यास त्यांना  या औषधांमुळे प्रकृती बरी झाल्यासारखं वाटू शकतं.  रुग्णांची स्थिती गंभीर झाल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून एलोपेथी औषधांच्या उपचारांसोबत ही औषधं दिली जात आहेत.

धमन्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन कमी झाल्याने एथेरोस्क्लेरोसिसचा असू शकतो धोका

आता नशायुक्त पदार्थांपासून तयार होणार कोरोनाची लस; लवकरच माणसांवर होणार चाचणी

Web Title: Homeopathy medicine camphora m can treat or used as adjuvant against coronavirus myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.