'या' ५ हार्मोन्समुळे कधीही वाढू शकतं महिलांचं वजन, कसं कराल कंट्रोल?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 12:54 PM2020-04-03T12:54:12+5:302020-04-03T12:57:48+5:30
वजन कमी करण्यासाठी कितीही व्यायाम, डाएट केलं तरी काही बदल दिसून येत नाही. कारण हार्मोन्सचा नकारात्मक परिणाम पडत असतो.
सध्या अनियमीत जीवनशैली आणि वातावरणातील बदलांमुळे वजन वाढण्याची समस्या सगळ्या वयोगटात दिसून येते. जे लोक तासनतास बसून काम करतात अशा लोकांना वजन वाढण्याची समस्या खूप जास्त उद्भवत असते. तसंच मासिक पाळी, गरोदरपणा अशा यांमुळे हार्मोन्सचं संतुलन बिघडतं त्यातून लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. वजन कमी करण्यासाठी कितीही व्यायाम, डाएट केलं तरी काही बदल दिसून येत नाही. कारण हार्मोन्सचा नकारात्मक परिणाम पडत असतो. आम्ही तुम्हाला त्या हार्मोन्सबद्दल सांगणार आहोत.
इंसुलिन
इंसुलिन शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये ग्लोकोज टाकण्यासाठी फायदेशीर ठरत असतं. याचा वापर एनर्जीच्या स्वरुपात केला जातो. रक्तातील इंसुलिनचा स्तर वाढून वजन वाढत असेल तर डायबिटिस टाईप-२ या आजाराचा धोका असू शकतो. त्यासाठी साखर, मद्य आणि अनहेल्दी पदार्थांचे सेवन करण्यापासून लांब राहणं फायदेशीर ठरेल.
थाईरॉईड
थायरॉईड ग्रंथी शरिरातील तीन हार्मोन्सना प्रभावीत करते. त्यात टी 3, टी 4 आणि कॅल्सीटोनिन यांचा समावेश असतो. मेटाबॉलिज्म, झोप, वाढ आणि हार्ट रेट, यांना नियंत्रण करण्याचे काम या हार्मोनचं असतं. या हार्मोन्सचं योग्य प्रमाण नसल्यामुळे थकवा येणे, वजन वाढणं अशा समस्या उद्भवतात.
कोर्टिसोल
हा स्टोरॉईड हार्मोन आहे. ज्यावेळी स्ट्रेस, डिप्रेशन आणि राग मानसिक स्वरूपातून वेदना सुद्धा होतात. या हार्मोनची लेव्हल वाढल्यानंतर भूक लागणं, वजन वाढणं अशा समस्या उद्भतात. त्यासाठी रोज व्यायाम, योगा करणं गरजेचं आहे.
प्रोजेस्टेरॉन
वजन कमी करायचं असेल तर शरीरातील प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन हे हार्मोन्स व्यवस्थित असं गरजेचं आहे. ताण-तणाव, मेनोपॉज, अन्हेल्दी आहार यामुळे प्रोजेस्टेरॉन ची लेवल कमी होते.
टेस्टोस्टेरॉन
पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये टेस्टोस्टोरॉनचं उत्पादन कमी प्रमाणात होत असतं. शरीरातील फॅट्स जाळण्यााठी आणि हाडांना मजबूत करण्यासाठी तसंच कामेच्छा वाढवण्यासाठी हा हार्मोन महत्वाचा असतो. वाढत्या वयात ताण-तणाव वाढल्यामुळे या हार्मोनची लेव्हल कमी होऊ शकते. त्यावेळी वजन वाढतं. यावर उपाय म्हणून रोज न चुकता व्यायाम करून आणि हेल्दी आहार घेऊन तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता.