वाफाळता चहा पिण्याची आहे सवय, मग वेळीच सावधान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 03:48 PM2018-02-19T15:48:07+5:302018-02-19T15:49:14+5:30

झोप उडवण्यासाठी तसंच ताजेतवाने वाटावे यासाठी अनेक जण वाफाळता,  गरमा-गरम चहा पिणं पसंत करतात. काहींना दिवसातून अनेकदा चहा पिण्याची सवय असते.

hot tea and cancer, so be careful then | वाफाळता चहा पिण्याची आहे सवय, मग वेळीच सावधान

वाफाळता चहा पिण्याची आहे सवय, मग वेळीच सावधान

Next

नवी दिल्ली - झोप उडवण्यासाठी तसंच ताजेतवाने वाटावे यासाठी अनेक जण वाफाळता, गरमा-गरम चहा पिणं पसंत करतात. काहींना दिवसातून अनेकदा चहा पिण्याची सवय असते. बहुतांश लोकांच्या दिवसाची सुरुवातच वाफळत्या चहा पिण्यापासून होते. अनेकांसाठी चहा हे अमृतासमानच असते.  दिवसातून दोन ते तीन वेळा चहा पिणे ठीक. मात्र काहींना दिवसातून चार ते पाच वेळाहून अधिक चहा पिण्याची सवय असते. मात्र ही सवय आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही. अधिक चहा प्यायल्याने आरोग्याचे नुकसान होते. अशाच चहाप्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

चीनमधील पेकिंग विद्यापीठातील संशोधकांनी गरमा-गरम चहा पिण्याबाबत संशोधन केले. गरम चहा पिणं शरीरासाठी अपायकारक असते, असं संशोधकांच्या संशोधनातून समोर आले आहे. पेकिंग विद्यापीठातील संशोधक जून लू यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरम चहा प्यायल्याने अन्न-नलिकेचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. जून लू, यांच्या म्हणण्याप्रमाणे, ज्या व्यक्तींना सिगारेट ओढण्याचे व्यसन आहे,  मद्यसेवनाची सवय आहे, अशा व्यक्ती अतिशय गरम चहा पित सतील तर त्यांना अन्न-नलिकेचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. जून लू, यांनी चीनमध्ये अतिशय गरम चहा पिणारे व्यक्ती आणि कॅन्सर याबाबत संशोधन केलं. चीनमध्ये सर्वात जास्त लोकं चहा पितात आणि कॅन्सर आजाराचं प्रमाणही मोठं आहे.

जून लू, यांना संशोधनात असं आढळलं की, पुरुषांना खूप गरम चहा पिण्याची सवय सिगारेट आणि दारूचं व्यसन 30 ते 79 वयोगटातील 4 लाख 56 हजार लोकांचं सर्व्हेक्षण 9 वर्षांनी पुन्हा लोकांचं आरोग्य परिक्षण 1737 व्यक्तींना अन्न-नलिकेचा कॅन्सर असल्याचे आढळले.
जे व्यक्ती खूप गरम चहा पित होते, आणि त्यांना सिगारेट-दारूचं व्यसन होतं त्यांच्यात कॅन्सर आजार होण्याचा धोका पाचपट जास्त वाढण्याची शक्यता असते. जून लू म्हणातात, जे व्यक्ती सिगारेट ओढतात किंवा दारूचं सेवन करतात त्यांनी खूप गरम चहा पिऊ नये.

Web Title: hot tea and cancer, so be careful then

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.