घरगुती उपायांनी घालवा ‘स्ट्रेच मार्क्स’ !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2016 04:12 PM2016-12-31T16:12:19+5:302016-12-31T16:12:19+5:30
बहुतांश महिलांना स्ट्रेच मार्क्सची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असते. साधारणत: अचानक वजन वाढल्याने किंवा कमी झाल्याने पोटावर, खांद्यावर, छातीवर, पायावर किंवा पार्श्व भागावर स्ट्रेच मार्क्स येतात.
Next
बहुतांश महिलांना स्ट्रेच मार्क्सची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असते. साधारणत: अचानक वजन वाढल्याने किंवा कमी झाल्याने पोटावर, खांद्यावर, छातीवर, पायावर किंवा पार्श्व भागावर स्ट्रेच मार्क्स येतात. विशेष म्हणजे प्रेगन्सीमध्ये किंवा टीनएजर्स (ज्यांच्यामध्ये पौगंडावस्थेत हार्मोनल चेंजेस होतात) याचे प्रमाण जास्त असते. आजच्या सदरात घरगुती उपायांनी स्ट्रेच मार्क्स कसे घालविता येतील याबाबत जाणून घेऊया.
* कोरफडीमध्ये त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्याची क्षमता असल्याने ते स्ट्रेच मार्क्सवर अत्यंत गुणकारी आहे. यासाठी कोरफड कापून त्याच्यातील गर स्ट्रेच मार्क्सवर लावा. असे नियमित केल्याने स्ट्रेच मार्क्स हळूहळू कमी होतील. कोरफडीचा गर व्हिटॅमिन ‘इ’ आॅइल मध्ये घालून ते मिश्रण देखील तुम्ही वापरू शकता.
* त्वचेतील आर्द्रता टिकविण्यासाठी खोबरेल तेल, एरंडेल तेल त्याचबरोबर आॅलिव्ह आॅइलचा वापर केला जातो. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी आॅलिव्ह आॅइल थोडं गरम करून स्ट्रेच मार्क्स वर लावा. सकाळी कोमट पाण्याने अंघोळ करा. आॅलिव्ह आॅइल आणि खोबरेल तेल एकत्र करून ही तुम्ही लावू शकता. एरंडेल तेल वापरताना कोमट करून स्ट्रेच मार्क्स वर लावा आणि कपडा गरम पाण्यात ओला करून त्याभोवती गुंडाळून ठेवा. कपड्याऐवजी प्लास्टिक शीटचा देखील तुम्ही वापर करू शकता किंवा गरम पाण्याच्या पिशवीने तो भाग शेकवा. वाफेमुळे त्वचेचे पोर्स ओपन होतात आणि तेल आत मुरायला मदत होते.
* स्ट्रेच मार्क्सवर अंड्यातील पांढरा भागही अत्यंत गुणकारी आहे, कारण त्यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. यासाठी २ अंड्यांचा पांढरा भाग घेऊन स्ट्रेच मार्क्सवर जाडसर थर लावा. थर पूर्णपणे सुकल्यावर पाण्याने स्वच्छ करा. आणि मग त्यावर आॅलिव्ह आॅइल लावा.
* लिंबू मधील आम्ल गुणधर्म तसेच नैसर्गिक ब्लिच असल्याने स्ट्रेच मार्क्स घालविण्यास मोठी मदत होते. यासाठी लिंबाचा रस सावकाश स्ट्रेच मार्क्स वर लावा. १० मिनिटं ठेऊन गरम पाण्याने धुवून टाका. दिवसातून १-२ वेळा असे केल्याने चांगला फरक पडतो.
* स्ट्रेच मार्क्सच्या ठिकाणी मॉयश्चरायझर वापरल्यानेही खूप फायदा होतो. त्यामुळे त्वचेत ओलावा टिकून राहण्यास मदत होऊन त्वचेची लवचिकता सुधारते आणि त्याचा परिणाम म्हणजे स्ट्रेच मार्क्सची तीव्रता कमी होते. कोको बटर किंवा कोरफड युक्त मॉयश्चरायझर नियमित वापरा किंवा सम प्रमाणात कोरफड आणि आॅलिव्ह आॅइल एकत्र करून घरच्या घरी मॉयश्चरायझर तयार करा.
* खूप काळापासून असलेले स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी व्हिटॅमिन ‘इ’ युक्त आॅइलचा नियमित वापर करा. व्हिटॅमिन ‘इ’ मध्ये ‘अॅन्टिआॅक्सिडेंट प्रॉपर्टिज’असल्यामुळे ‘कोलॅजन’डॅमेज होण्यापासून बचाव होतो. म्हणजेच त्वचा सुरक्षित राहते.