वजन कमी करण्यासाठी जिम कशाला? घरातली काम करुनही घटवता येतं तब्बल 'इतके' वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 05:56 PM2022-06-12T17:56:09+5:302022-06-12T17:58:20+5:30

घरात झाडू-फारशी पुसणं, कपडे धुणं या गोष्टी तुम्ही कराल तर ते नक्कीच उपयोगी ठरेल. यातून वजन कमी करण्यासह पाठदुखी, पाय आणि कंबरदुखी यांपासूनही सुटका मिळू शकते.

household work can help you to loose weight | वजन कमी करण्यासाठी जिम कशाला? घरातली काम करुनही घटवता येतं तब्बल 'इतके' वजन

वजन कमी करण्यासाठी जिम कशाला? घरातली काम करुनही घटवता येतं तब्बल 'इतके' वजन

googlenewsNext

वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग, व्यायाम आणि बऱ्याच गोष्टींची मदत घेतात. मात्र यासोबतच घरातली काही कामं करूनही तुम्ही वजन कमी करण्याचा वेग वाढवू शकता. (weight loss) हो, हे खरं आहे. घरात झाडू-फारशी पुसणं, कपडे धुणं या गोष्टी तुम्ही कराल तर ते नक्कीच उपयोगी ठरेल. यातून वजन कमी करण्यासह पाठदुखी, पाय आणि कंबरदुखी यांपासूनही सुटका मिळू शकते. सोबत वजन नियंत्रणात राहातं. हेल्दी डायट, योगा व्यायामासह घरकामातूनही फिट राहता येतं. जाणून घ्या या कामांबद्दल. (weight loss tips)

फरशी पुसणं
तुम्हाला माहीत आहे का, की फरशी पुसताना तुम्ही जवळपास 145 कॅलरीज बर्न करता. हे ट्रेडमिलवर 15 मिनिट धावण्यासारखं आहे. मात्र तुमचे पाय किंवा पाठीत दुखत असल्यास बसून पुसा. यातून पायांचा व्यायाम होईल. तिथले फॅट कमी होऊन पाय टोन होतील. (weight loss through household works)

कपडे धुणं
वॉशिंग मशीन आल्यानं कपड्यांवरील मळ काढणं आता सोपं झालं आहे. मात्र हातानं कपडे धुताना खूप कॅलरी बर्न केली जाऊ शकते. हे जवळपास 100 बैठका काढण्यासारखं आहे. यातून शरीर हेल्दी राहतं. (cooking and weight loss strategy)

जेवण बनवणं
भाजी कापण्यापासून चपात्या लाटण्यापर्यंत जेवण बनवताना अशी अनेक कामं असतात ज्यात तुम्ही गुंतलेले असता. पूर्ण शरीर यात सहभागी होतं. 1 तासात तुम्ही जवळपास 150 कॅलरी बर्न करू शकता. 15 मिनिट केलेल्या एरोबिक्सइतक्याच कॅलरी यात जळतात. (cleaning home and weight loss)

डस्टिंग करणं
टीव्ही, फ्रिज, टेबलावरची धूळ पुसणं हे काम तुम्ही केलं तर 30 मिनिटात 180 पर्यंत कॅलरीज बर्न होऊ शकतात. हे 15 मिनिट सायकलिंग करण्यासारखं आहे. असं केल्यानं शरीर फिट राहतं.

अंथरून टाकणं
अंथरून टाकताना 15 मिनिटात 66 कॅलरी बर्न केल्या जाऊ शकतात. हे दीड किलोमीटर पायी चालण्यासारखं आहे. यातून हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो. शरीर फिट राहतं.

Web Title: household work can help you to loose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.