डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरतो ब्लॅक राइस, वाढणार नाही ब्लड शुगर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 09:51 AM2022-11-12T09:51:33+5:302022-11-12T09:52:57+5:30

Black Rice : पांढऱ्या तांदळामध्ये जास्त प्रमाणात कार्ब्स असतात. त्यामुळे डॉक्टर डायबिटीसच्या रूग्णांना भात खाण्यास मनाई करतात. आज आम्ही तुम्हाला पांढऱ्या भाताला पर्यायी भात सांगणार आहोत.

How black rice is beneficial for diabetic patients know the black rice benefits | डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरतो ब्लॅक राइस, वाढणार नाही ब्लड शुगर

डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरतो ब्लॅक राइस, वाढणार नाही ब्लड शुगर

googlenewsNext

Black Rice : भात हा भारतीयांच्या रोजच्या आहारातील महत्वाचा भाग आहे. बालपणापासून सगळेच वेगवेगळ्या भाज्यांसोबत भात खाल्ला जातो. अचाकन एखाद्याला भात खाण्यास मनाई केली तर विचार करा त्यांना काय वाटेल. डायबिटीसच्या रूग्णांना नेहमीच गोड पदार्थांसोबत फॅट, जास्त मीठ, तेल आणि कार्ब्स असलेले पदार्थ खाण्यास मनाई केली जाते.

पांढऱ्या तांदळामध्ये जास्त प्रमाणात कार्ब्स असतात. त्यामुळे डॉक्टर डायबिटीसच्या रूग्णांना भात खाण्यास मनाई करतात. आज आम्ही तुम्हाला पांढऱ्या भाताला पर्यायी भात सांगणार आहोत. तुम्ही डायबिटीसचे रूग्ण असाल आणि भात खाण्याची इच्छा पूर्ण करायची असेल सोबतच ब्लड शुगरही कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर तुम्ही डेली डाएटमध्ये पांढऱ्याऐवजी काळ्या तांदळाचा समावेश करू शकता.

ब्लॅक राइस

डायबिटीस झाल्यावर रूग्णांना त्यांचे आवडीचे पदार्थ खाता येत नाही. पण जरा डोकं वापरलं तर असं करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही स्मार्टनेसने काम घेतलं तर तुम्ही तर त्याजागी हेल्दी ऑप्शनला डाएटमध्ये सामिल करण्यावर फोकस करा. याने तुमची ब्लड शुगर कंट्रोलमध्येही राहील आणि डायबिटीसचा धोकाही कमी होईल.

डायबिटीसच्या रूग्णांसाठी बेस्ट ऑप्शन आहे ब्लॅक राइस

हेल्थ एक्सपर्टनुसार, जेव्हा आरोग्य आणि पोषणाचा मुद्दा येतो तेव्हा भाताला जास्त हेल्दी मानलं जात नाही. भारतीय आहाराचा महत्वाचा भाग असूनही डायबिटीसच्या रूग्णांना भात खाण्यास मनाई केली जाते. कारण यात स्टार्चयुक्त  कार्बोहायड्रेट असतात, जे जेवणानंतर ब्लडमध्ये ग्लूकोजचं प्रमाण अचानक वाढवतात. पण ब्लॅक राइस असा नाहीये.

अनेकांना हे माहीत नाही की, डायबिटीसच्या रूग्णांसाठी ब्लॅक राइस एक हेल्दी ऑप्शन आहे. काळ्या तांदळात पोषक तत्व असतात. हे पांढऱ्या तांदळापेक्षा चांगले असतात. 

ब्लड शुगर राहतं कंट्रोल

काळ्या तांदळात फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. हे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवण्यास महत्वाची भूमिका बजावतात. 

वजन होतं कमी

वजन वाढलं तर डायबिटीसच्या रूग्णांना आणखी जास्त समस्या होऊ शकते. हे एक मोठं कारण आहे की, डायबिटीसच्या रूग्णांना पांढरा भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. तेच दुसरीकडे काळे तांदूळ तुमचं वजन संतुलित ठेवण्यास मदत करतात. 

ब्लॅक राइस आहे ग्लूटन फ्री 

डायबिटीसच्या रूग्णांना ग्लूटेनपासून वाचण्याचा सल्ला दिला जातो. कारण याने पोटोवर सूज वाढते आणि पोट दुखण्याची समस्याही होऊ शकते. ब्लॅक राइस हा ग्लूटेन फ्री असतो.

टाइप 2 डायबिटीसचा धोका कमी करतो

जर तुम्ही डायबिटीसचे रूग्ण नसाल तेव्हाही तुम्ही हा ब्लॅक राइस खाऊ शकता. यात फायबर आणि मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असतं. याने तुमच्या शरीरातील ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. ज्यामुळे भविष्यात तुम्हाला डायबिटीस होण्याचा धोका कमी राहतो.

ब्लॅक राइस कुणी खाऊ नये

काळे तांदूळ सामान्यपणे हेल्दी मानले जातात आणि सध्या असं कुठे आढळून आलं नाही की, काळे तांदूळ खाल्ल्याने कुणाला काही समस्या झाली. पण तरीही जास्त काळे तांदूळ खाल्ल्याने तुम्हाला पोटासंबंधी समस्या जसे की, गॅस, सूज अशा समस्या होऊ शकतात. त्यामुळे ब्लक राइस संतुलित प्रमाणात खावा. जर तुम्हाला पोटासंबंधी काही समस्या असेल तर याचा आहारात समावेश करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Web Title: How black rice is beneficial for diabetic patients know the black rice benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.