कोरोनाकाळात फुफ्फुसांची इम्युनीटी 'अशाप्रकारे' करा बुस्ट, तज्ज्ञांच्या 'या' टिप्सने हे सहज शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 04:04 PM2022-01-07T16:04:29+5:302022-01-07T16:04:39+5:30

कोरोनाच्या काळात फुफ्फुसांच्या आरोग्याची (Lung health) काळजी घेणे खूप गरजेचे झाले आहे, हे सर्वांना माहीत आहे, कारण कोरोना विषाणू प्रथम फुफ्फुसांना लक्ष्य करतो.

how to boost lung immunity during corona period | कोरोनाकाळात फुफ्फुसांची इम्युनीटी 'अशाप्रकारे' करा बुस्ट, तज्ज्ञांच्या 'या' टिप्सने हे सहज शक्य

कोरोनाकाळात फुफ्फुसांची इम्युनीटी 'अशाप्रकारे' करा बुस्ट, तज्ज्ञांच्या 'या' टिप्सने हे सहज शक्य

Next

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्य टिकवून ठेवणे फार महत्त्वाचे आहे. योग्य आहार आणि व्यायाम करणे काळाची गरज आहे. आज आपण अशा गोष्टींविषयी जाणून घेऊया जे तुमच्या फुफ्फुसांना थेट हानी पोहोचवू शकतात. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, फुफ्फुस (Lung) शरीरातील अनेक कार्ये उत्तम प्रकारे चालवतात. फुफ्फुस खराब झाल्यावर आपल्या शरीराला शुद्ध ऑक्सिजन मिळण्यात खूप त्रास होऊ (Harmful Food for Lung) लागतो. त्यामुळे शरीरात इतर अनेक अडचणी निर्माण होतात. कोरोनाच्या काळात फुफ्फुसांच्या आरोग्याची (Lung health) काळजी घेणे खूप गरजेचे झाले आहे, हे सर्वांना माहीत आहे, कारण कोरोना विषाणू प्रथम फुफ्फुसांना लक्ष्य करतो.

आहार तज्ज्ञ काय म्हणतात
फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार आवश्यक असल्याचे आहारतज्ज्ञ डॉ.रंजना सिंह यांनी झी न्यूजला माहिती दिली आहे. अशाही काही गोष्टी आहेत, ज्यामुळे फुफ्फुसे कमकुवत होतात, त्यांच्यापासून दूर राहणे गरजेचे आहे. यामध्ये धुम्रपान आणि तंबाखू व्यतिरिक्त प्रक्रिया केलेले मांस, साखरयुक्त पेये आणि खूप मद्यपान यांचा समावेश आहे. त्यांच्या सेवनाने फुफ्फुसांना इजा होऊ शकते. त्यामुळे त्यांचे सेवन करू नये.

फुफ्फुसासाठी हानिकारक गोष्टी

मर्यादेत दुग्धजन्य पदार्थांचे सेवन
दूध, दही आणि चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असले, तरी जेव्हा तुम्ही त्यांचे जास्त प्रमाणात सेवन करण्यास सुरुवात करता तेव्हा ते फुफ्फुसासाठी हानिकारक ठरतात. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांचे अधिक सेवन करू नये.

मीठ
सिंह यांच्या मते, मीठ आरोग्यासाठी आवश्यक मानले जाते, परंतु मर्यादित प्रमाणात. जेव्हा कोणी जास्त प्रमाणात मीठ खातो तेव्हा त्याला फुफ्फुसाच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळेच फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी मीठाचे सेवन कमी करा.

साखरयुक्त पेयांपासून दूर रहा
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की साखरयुक्त पेये फुफ्फुसासाठी हानिकारक आहेत, कारण यामुळे प्रौढांमध्ये ब्राँकायटिस होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत साखरयुक्त पेयांचे सेवन टाळावे. त्याऐवजी जमेल तेवढे पाणी प्या.

Web Title: how to boost lung immunity during corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.