CoronaVirus : घरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण असेल तर कशी घ्याल काळजी? तज्ज्ञांच्या टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 02:00 PM2021-04-13T14:00:10+5:302021-04-13T14:14:12+5:30
जर तुमच्या घरात कुणी कोरोना पॉझिटिव्ह असेल किंवा घरातील कुणी असं काम करतं ज्यात जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात यावं लागतं.
कोरोनाने गेल्या काही दिवसात आधीपेक्षा जास्त थैमान घातलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, भारतात कोरोना रूग्णांचा आकडा १२ लाखांच्यावर गेला आहे. अमेरिकेनंतर भारतात जगातील सर्वात जास्त कोरोना केसेस आहेत. अशात नागरिकांनी जास्त जागरूक राहण्याची गरज आहे.
Aajtak ने दिलेल्या वृत्तानुसार, अनेकदा पाहण्यात आलं आहे की, जास्तीत जास्त लोक कोरोना संक्रमित रूग्णाच्या संपर्कात येऊनच कोविड-१९ पॉझिटिव्ह होते आहेत. त्यामुळे फारच गरजेचं आहे की, जर तुमच्या घरात कुणी कोरोना पॉझिटिव्ह असेल किंवा घरातील कुणी असं काम करतं ज्यात जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात यावं लागतं. तर त्यांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी हार्ट केअर फाउंडेशन ऑफ इंडियाचे प्रेसीडेंट डॉ. के.के. अग्रवाल यांनी आजतकसोबत बोलताना काही टिप्स सांगितल्या आहेत. (हे पण वाचा : coronavirus: त्यामुळे भारतात वेगाने होतोय कोरोनाचा फैलाव, तज्ज्ञांनी सांगितली ही चार कारणे)
डॉ. अग्रवाल म्हणाले की, COVID - 19 च्या दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने लोक संक्रमित होत आहेत. अशात हॉस्पिटल्समद्य बेडची कमतरता भासत आहे. अनेकांना बेड मिळत नाहीयेत. अशात जास्तीत जास्त कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर घरी उपचार करता येतात. म्हणजे जे जास्ती सीरिअस नाहीत अशा रूग्णांवर. यासाठी घरातील लोकांनी ४ स्टेपचा अवलंब करावा.
१) सर्वात पहिलं काम हे करा की, जर तुमच्या घरात कुणी कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्यांना लगेच आयसोलेट करा. त्यांना डबल मास्क लावण्यास सांगा आणि स्वत:ही डबल मास्क लावा.
२) कोरोना पॉझिटिव्ह किंवा संशयित रूग्णाच्या संपर्कात येत असाल तर घरातही फेस शील्ड वापरा. किंवा बाहेर गर्दीच्या ठिकाणी कामाला जात असाल तर तेव्हाही फेश शील्ड लावून ठेवा.
३) सोबतच हेही गरजेचं आहे की, रोज दिवसांतून दोन वेळा कोमट मिठाच्या पाण्याने गुरळा करा. दोन वेळा वाफ घ्या.
४) सोबतच घरात कोरोना रूग्ण असताना रूग्णाने आणि तुम्हीही शू कव्हर घालावे.
या टिप्सने अशा लोकांना फार फायदा होईल जे कोविड-१९ रूग्णांची काळजी घेत आहेत. किंवा जे दुकानदार म्हणून दिवसभर सार्वजनिक रूपाने काम करत आहेत.