पोटाचा वाढलेला घेर आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर 'खास' तेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 10:07 AM2019-10-29T10:07:10+5:302019-10-29T10:07:17+5:30

अनेकजण असं सांगतात की, जर वजन कमी करायचं असेल तेल तुमच्यापासून दूर ठेवा. जास्तीत जास्त लोक आहारातील तेलालाच वजन वाढण्याचं मुख्य कारण मानतात.

How castor oil helps in weight loss and reducing belly fat | पोटाचा वाढलेला घेर आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर 'खास' तेल!

पोटाचा वाढलेला घेर आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर 'खास' तेल!

googlenewsNext

अनेकजण असं सांगतात की, जर वजन कमी करायचं असेल तेल तुमच्यापासून दूर ठेवा. जास्तीत जास्त लोक आहारातील तेलालाच वजन वाढण्याचं मुख्य कारण मानतात. पण हे पूर्णपणे सत्य नाहीये. मात्र, एक असंही तेल आहे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. ते तेल म्हणजे एरंडीचं तेल. एरंडीच्या तेलाला आयुर्वेदात फार महत्व आहे. वेगवेगळ्या आजारांच्या उपचारासाठी एरंडीच्या तेलाचा वापर केला जातो. या तेलाने केवळ वजन कमी होणार असे नाही तर बाहेर आलेलं पोटही आत जाईल. चला जाणून घेऊ कसं....

फॅटकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू नका

(Image Credit : lanap.com)

फॅट म्हणजेच चरही शरीरासाठी गरजेच्या पोषक तत्वांपैकी एक तेल आहे. त्यामुळे तेलाला पूर्णपणे दूर करणे चुकीचे ठरेल. तेल आपल्या डाएट आणि जीवनाचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे हे गरजेचं आहे की, तेलाबाबतची तुमची चॉइस स्मार्ट असावी. वेगवेगळ्या तेलांच्या माध्यमातून तुम्ही बाहेर आलेलं पोट आत घेऊ शकता आणि वजन कमी करण्यासही तुम्हाला मदत मिळेल. त्यातीलच एक तेल म्हणजे कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडीचं तेल.

अ‍ॅंटी-बायोटिक एजन्ट

केसांची वाढ करण्यासोबतच या तेलाने पोटदुखीची समस्या दूर करण्यासह मदत मिळते. या तेलात रिसिनोलेइक अ‍ॅसिड असतं जे एक ट्रायग्लिसराइड फॅटी अ‍ॅसिड असतं. हे अ‍ॅसिड लॅक्सेटिव्हच्या रूपात काम करतं आणि अ‍ॅंटी-ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा कमी करणाऱ्या एजन्टच्या रूपातही ओळखलं जातं. 

मेटाबॉलिज्म करतं चांगलं

(Image Credit : cookinglight.com)

डाएटमध्ये कॅस्टर ऑइलचा समावेश करून रेग्युलर बेसिसवर याचं सेवन केल्याने व्यक्तीचं मेटाबॉलिज्म मजबूत होतं. मेटाबॉलिज्म जेवढं जास्त मजबूत होईल, तेवढीच जास्त मदत वजन कमी करण्यास होईल.

वॉटर रिटेंशनमुळे समस्या होईल दूर

(Image Credit : simplyweight.co.uk)

शरीरात वॉटर रिटेंशन होणं म्हणजेच शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये पाणी जमा होणे. या कारणाने देखील व्यक्ती लठ्ठ दिसतो. अशात एरंडीचं तेल शरीरावर लावल्याने किंवा याचं सेवन केल्याने कोलोन आणि डायजेस्टिव सिस्टीमच्या आजूबाजूला जमा झालेलं अतिरिक्त पाणी शरीरातून बाहेर काढण्यास मदत मिळते. या प्रोसेसमध्ये शरीर पूर्णपणे डिटॉक्स होतं. 

कसं करावं सेवन?

(Image Credit : healthline.com)

इतर तेलांच्या तुलनेत एरंडीच्या तेलाची टेस्ट फार चांगली नसते. अशात तुम्ही थोड्या प्रमाणातही या तेलाचं सेवन कराल तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्हाला हवं तर रोज सकाळी अनोशा पोटी १ चमचा तेलाचं सेवन करू शकता. पण हे करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. जर याची टेस्ट तुम्हाला अजिबातच आवडली नसेल तर हे तेल तुम्ही आल्याच्या रसासोबतही घेऊ शकता. तसेच या तेलाने तुम्ही पोटाची आणि नाभिच्या आजूबाजूची मालिश करा. याने पोट कमी करण्यास मदत मिळेल. 

या गोष्टींची घ्या काळजी

(Image Credit : healthline.com)

कोणत्याही गोष्टीची अति करणे वाईटच असतं. त्यामुळे कॅस्टर ऑइलचं सेवनही लिमिटमध्ये करणं फायद्याचं ठरेल. कारण कॅस्टर ऑइल लॅक्सेटिव्ह एजन्टच्या रूपात काम करतं. त्यामुळे या तेलाचं अधिक सेवन केल्याने डायरिया आणि इतरही समस्या होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी कॅस्टर ऑइलचं सेवन करण्यासोबतच हेल्दी आणि संतुलित आहाराचं देखील सेवन करावं. 

(टिप : वरील लेखातील सल्ले हे केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. त्यामुळे यांचा वापर करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचां सल्ला आवर्जून घ्यावा. कारण काहींना याची अॅलर्जी असून शकते. अशात या तेलाचा फायदा होण्याऐवजी याने नुकसानही होऊ शकतं.)


Web Title: How castor oil helps in weight loss and reducing belly fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.