साबण, मीठासह 'या' उपायांनी मास्क स्वच्छ कराल; तरच संक्रमणापासून लांब राहाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 12:35 PM2020-06-26T12:35:48+5:302020-06-26T12:50:36+5:30
CoronaVirus News: मास्कच्या वापराबाबात काही गोष्टी सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही कोरोनाच्या संक्रमणापासून लांब राहू शकता.
कोरोना व्हायरसचं संक्रमण संपूर्ण जगभरात पसरलेलं असून भारतातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात मृत्यूदर कमी असला तरी या माहामारीने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टेंसिंगचा वापर सर्वत्र होताना दिसून येत आहे. अनेक रिसर्चमध्ये दिसून आले आहे की, मास्क वापरत असतानाही कोरोनाच संक्रमण होऊ शकतं. आज आम्ही तुम्हाला मास्कच्या वापराबाबात काही गोष्टी सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही कोरोनाच्या संक्रमणापासून लांब राहू शकता.
मास्क गरम पाण्यात आणि उन्हात धुवून सुकवा
मास्क शक्यतो वॉशेबल असल्यास उत्तम ठरेल. बाहेरून घरी आल्यानंतर मास्क काढून साबण आणि पाण्याने धुवा. उन्हात मास्क सुकू द्या. नंतरच पुन्हा वापरा. जेणेकरून संक्रमणाचा धोका उद्भवणार नाही. पावसाळ्यात वातावरणात ओलावा असतो. त्यामुळे कपडे सुकण्यासाठी वेळ लागतो. अशा स्थितीत प्रेशर कुकरमध्ये पाणी घाला. त्यात मीठ घाला. यात १५ मिनिटांपर्यंत मास्क घालून ठेवा. त्यानंतर मास्क पाण्यातून बाहेर काढून पिळून सुकवायला ठेवा.
सुकवण्यासाठी इस्त्रीचा वापर करा
मास्क साबणाने धुतल्यानंतर सुकवण्यासाठी तुम्ही इस्त्रीचाही वापर करू शकता. केंद्र सरकारने सोशल मीडियावर दिलेल्या एका व्हिडीओत मास्कच्या वापराबाबत गाईडलाईन्स देण्यात आल्या आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी फक्त वॉशेबल मास्कसाठी या पद्धतीचा वापर करा. डिस्पोजेबल मास्क एकदा वापरून फेकून द्या.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्वच्छतेच्या उत्पादनांच्या विशेषतः मास्क आणि हात धुवायच्या सॅनिटायझर्सच्या खरेदीकडे वळल्यामुळे अचानक मागणी वाढून टंचाई निर्माण झाली. त्यामुळे तुम्ही घरच्याघरी मास्क तयार करून लावू शकता. दरम्यान WHO ने दिलेल्या माहितीनुसार अनेकदा जास्तवेळपर्यंत मास्क लावणं घातक ठरू शकते. कारण कार्बन डायऑक्साईडचा स्तर वाढल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
त्यासाठी एन 95 मास्क आरोग्य विभागातील कर्मचारी वर्गासाठी आवश्यक आहे. पण तुम्ही या मास्कचा वापर करत असाल तर दीर्घकाळ वापरू नका. धावत असताना किंवा वेगाने चालताना एन95 मास्क काढून टाका. मास्कशिवाय घराबाहेर पडू नका. मास्क गरजेपेक्षा जास्त घट्ट बांधू नका.
घरी तयार केलेले मास्त जास्त फायदेशीर ठरतील कारण त्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होत नाही. कारण त्यासाठी सुती कापडाचा वापर केला जातो. जर मास्क घातल्यानंतर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर सुरक्षित ठिकाणी आराम करा. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
CoronaVirus: रेल्वे स्टॉलवर आता मास्क, सॅनिटायझर, उशा, बेडरोल आणि टॉवेलही मिळणार