रोज कापडाचा मास्क वापरता? जाणून घ्या मास्कच्या वापराबाबत समोर आलेलं नवीन संशोधन 

By Manali.bagul | Published: October 13, 2020 11:56 AM2020-10-13T11:56:50+5:302020-10-13T11:57:39+5:30

CoronaVirus News & Latest Updates : तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त एन ९५  मास्क नाही तर तीन लेअर्सपासून तयार झालेला कापडाचा मास्क कोरोनापासून बचाव करण्याासाठी प्रभावी ठरू शकतो.

How to clean mask to defeat coronavirus prevention by cotton clothes masks | रोज कापडाचा मास्क वापरता? जाणून घ्या मास्कच्या वापराबाबत समोर आलेलं नवीन संशोधन 

रोज कापडाचा मास्क वापरता? जाणून घ्या मास्कच्या वापराबाबत समोर आलेलं नवीन संशोधन 

googlenewsNext

जोपर्यंत कोरोना व्हायरसला रोखणारी लस किंवा औषध येत नाही तोपर्यंत मास्कचा वापर, सोशल डिस्टेंसिंग, वैयक्तिक स्वच्छता या उपायांचा अवलंब  करायला हवा. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करणं गरजेचं आहे याची कल्पना सगळ्यांनाच आहे.  कोरोनाला लांब ठेवण्यासाठी मास्कचा वापर सध्या प्रत्येकजण करत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त एन ९५  मास्क नाही तर तीन लेअर्सपासून तयार झालेला कापडाचा मास्क कोरोनापासून बचाव करण्याासाठी प्रभावी ठरू शकतो.

ऑस्ट्रेलियामध्ये न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातील प्राध्यापक रैना मॅकइंटायर यांनी दिलेल्या माहितीनुसार कापडाचा मास्क आणि सर्जिकल मास्क या दोन्हींचा वापर एकदाच करून झाल्यानंतर पुन्हा पुन्हा करू नये. सर्जिकल मास्कचा वापर करून झाल्यानंतर लगेचच फेकून द्यायला हवा.  कापडाचा मास्क सतत वापरल्यानं संक्रमणाचा धोका वाढतो. बीएमजे ओपन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात आरोग्य कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवेतील लोकांच्या आकडेवारीवर संशोधन करण्यात आलं होतं. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसर आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांनी आपला मास्क रोजच स्वच्छ धुवायला हवा.

कोरोना वायरस पर खोज जारी

मास्क हाताने धुणं कितपत सुरक्षित

संशोधकांनी आपल्या अभ्यासात दिलेल्या माहितीनुसार इन्फुएंजा व्हायरस,  रायनोव्हायरस आणि मोसमी कोरोना व्हायरस यांसारख्या श्वसनाशी निगडीत असलेल्या समस्यांवर परिक्षण केले होते. त्यात असं दिसून आलं की, हाताने मास्क धुतल्यानंतर पुरेशी सुरक्षा मिळत नाही.  मास्क मशिनमध्ये धुण्याच्या तुलनेत हाताने धुतल्यास संक्रमणाचा धोका दुप्पट असतो. म्हणून मास्क शक्यतो हाताने धुणं टाळावं असे या संशोधनातून स्पष्ट होतं. 

मास्क धुतल्याशिवाय वापर करणं टाळा

जागतिक आरोग्य संघटनेनंही हाताने धुतला जात असलेला मास्क  ६० डिग्री सेल्सियसवर गरम पाण्याने धुण्याचा सल्ला दिला आहे. प्राध्यापक मॅक्लेन्टेयर यांनी दिलेल्या माहितीनुसार कापडापासून तयार झालेला मास्क प्रभावी ठरतो. पण या मास्कचा वापर पुन्हा करण्यासाठी सतत धुत राहणंही गरजेचं आहे. 

देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट

दरम्यान देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली असून मृतांचा आकडा ही कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आजच्या नव्या रुग्णांची संख्या सर्वात कमी आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 55,342 नवे रुग्ण आढळले आहेत. याआधी कोरोनाचे 60 हजार रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी (13 ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 55,342 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 71,75,881 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,09,856 वर पोहोचला आहे. CoronaVirus News: कोरोना लस! महिलेला अज्ञात आजार; जॉन्सन अँड जॉन्सनने चाचणी थांबविली

देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 8,38,729 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 62,27,296 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने उच्चांक गाठल्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यात मात्र सलग दिलासा देणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोना संसर्ग झालेल्यांच्या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. 1 ऑक्टोबरनंतर देशातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या 80 हजारांच्या पुढे गेलेली नाही. येत्या काळातही हेच चित्र राहिल्यास लवकरच कोरोना रुग्णांची संख्या घटत जाईल. पॉझिटिव्ह बातमी! भारतात सलग ८ दिवस कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची १ हजारापेक्षा कमी

Web Title: How to clean mask to defeat coronavirus prevention by cotton clothes masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.