दिलासादायक! या आजाराची लस घेतल्यास कोरोनाचा धोका ३९ टक्क्यांनी होणार कमी, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 04:20 PM2020-10-30T16:20:21+5:302020-10-30T16:25:07+5:30

CoronaVirus News & Latest Updates : या संशोधनातून समोर आलं की, ज्या लोकांना फ्लू ची लस देण्यात आली त्यांच्यात कोरोना संक्रमणाचा धोका ३९ टक्क्यांनी कमी झाला होता.

How coronavirus flu vaccine may help reduce covid-19 infection by 39 percent research reveals | दिलासादायक! या आजाराची लस घेतल्यास कोरोनाचा धोका ३९ टक्क्यांनी होणार कमी, तज्ज्ञांचा दावा

दिलासादायक! या आजाराची लस घेतल्यास कोरोनाचा धोका ३९ टक्क्यांनी होणार कमी, तज्ज्ञांचा दावा

googlenewsNext

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणात जगभरातील लोक एक सुरक्षित आणि परिणामकारक लसीच्या प्रतिक्षेत आहे. रशिया, चीन या देशात आपातकालीन स्थितीत लसीकरणासाठी सुरूवात झाली असून  जोखिम घेऊन लोकांना लस दिली जात आहे. इंडोनेशिया आणि ब्रिटेनमध्ये पुढच्या महिन्यापासून लसीकरण सुरू होणार असल्याची चर्चा आहे. भारतासह अनेक देशांमध्ये कोरोनाची लस तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हिवाळ्यात कोरोनासह फ्लूसारखे अन्य आजार पसरण्याचा धोका वाढत आहे. अनेक तज्ज्ञांकडून कोरोनाची लस उपलब्ध होईपर्यंत फ्लू या आजाराची लस दिली जाण्याचा सल्ला दिला जात आहे. या अभ्यासातून वैज्ञानिकांनी सांगितले की, फ्लूच्या लसीमुळे कोरोनाचं संक्रमण कमी होण्यास मदत मिळते.

नेदरलँडच्या रेडबाऊंड युनिव्हर्सिटीतील एका संशोधनात वैज्ञानिकांनी सांगितले की, फ्लूची लस कोरोना व्हायरसपासून बचावसाठी कशी परिणामकारक ठरते. नेदरलँडच्या  रेडबाऊंट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरच्या इम्यूनेलॉजिस्ट मिहाई नेटी यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०१९ ते २०२० मध्ये हिवाळ्याच्या वातावरणात फ्लूची लस देण्यात आली होती. त्यांच्यावर  कोरोनाचा होणारा प्रभाव याचा अभ्यास करण्यात आला होता. या संशोधनातून समोर आलं की, ज्या लोकांना फ्लू ची लस देण्यात आली त्यांच्यात कोरोना संक्रमणाचा धोका ३९ टक्क्यांनी कमी झाला होता.

प्रतीकात्मक तस्वीर

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, फ्लूची लस शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवते, ज्यामुळे अनेक प्रकारच्या व्हायरसशी लढण्याची क्षमता मिळते. हे विशिष्ट साइटोकाइन स्ट्रोम्सना देखील प्रतिबंधित करते. सायटोकीन स्ट्रोम, अशी स्थिती असते ज्यामध्ये कोरोना संक्रमणानंतर रोगाचा प्रतिकार करणारी रोगप्रतिकारक शक्ती अतिसक्रिय होते, अनियंत्रित होते त्यामुळे शरीराला हानी पोहोचते.

हिवाळ्यात फ्लूची लस का गरजेची आहे?

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हिवाळ्यात कोरोना आणि फ्लू या दोघांच्या विषाणूजन्य संक्रमणाचा धोका वाढू शकतो. शास्त्रज्ञांनी अशा संभाव्य स्थितीस 'ट्विन्डेमिक' असे नाव दिले आहे. त्यांना असा विश्वास आहे की कोल्ड इन्फेक्शनचा धोका कमी करण्यासाठी सर्व लोकांनी फ्लूची लस घेणं आवश्यक आहे. दिल्ली एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनीही असा सल्ला दिला आहे. काळजी वाढली! लॉकडाऊनमुळे मानसिक ताणासह 'या' आजाराचा वाढतोय धोका, संशोधनातून खुलासा

व्हायरल फ्लू आणि कोरोना विषाणूची लक्षणे काही प्रमाणात सारखीच असतात.  अनेकदा फ्लूचं संक्रमण झाले असले तरी कोरोना संक्रमणाची भीती असते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लक्षणे बहुधा श्वासनलिका, घसा आणि फुफ्फुसांशी संबंधित असतात. या लक्षणांमध्ये खोकला कोरडा तसंच अतिसार होऊ शकतो. फ्लूची बहुतेक लक्षणे नाकाशी संबंधित असतात. फ्लूमुळे घश्याचा त्रास होत नाही, तर यामुळे  कफ होऊ शकतो. तज्ज्ञ या दोघांमधील फरक अधिक चांगल्या पद्धतीने समोर आणण्यासाठी संशोधन करत आहेत. मोठा दिलासा! येत्या डिसेंबरमध्ये कोरोनाची लस येणार?; आदर पुनावालांनी सांगितले की....

Web Title: How coronavirus flu vaccine may help reduce covid-19 infection by 39 percent research reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.