पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही किती आणि कसं ठरतं फायदेशीर?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 10:32 AM2023-08-25T10:32:16+5:302023-08-25T10:34:59+5:30

Belly Fat : The American Dietetic Association यांच्यानुसारही पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही फायदेशीर ठरतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, पोटवरील चरबी कमी करण्याच्या दृष्टीने दिवसातून किती वेळा दही खावे. 

How curd help to reduce belly fat, you should know it | पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही किती आणि कसं ठरतं फायदेशीर?

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही किती आणि कसं ठरतं फायदेशीर?

googlenewsNext

Belly Fat : अलिकडच्या चुकीच्या लाइफस्टाईलमुळे अनेकांना पोटावरील चरबी वाढण्याची समस्या होते. अशात लोकांना यामुळे वेगवेगळ्या गंभीर आजारांचाही सामना करावा लागतो. लोक पोटावरील चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. पण एक्सपर्ट्सही मानतात की, बेली फॅट म्हणजेट पोटावरील चरबी कमी करणं सर्वात कठिण असतं. एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलंय आणि The American Dietetic Association यांच्यानुसारही पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही फायदेशीर ठरतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, पोटवरील चरबी कमी करण्याच्या दृष्टीने दिवसातून किती वेळा दही खावे. 

डाएट एक्सपर्ट्स असं मानतात की, २४ तासातून तुम्ही जर ३ वेळा दह्याचं सेवन केलं तर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होण्यापासून वाचू शकता. पोटावर चरबी आल्याने वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. जर तुम्हालाही पोटावर चरबी वाढल्याची समस्या झाली असेल तर दही खाण्याचे फायदे जाणून घेतले पाहिजे.  

बेली फॅट का आहे घातक?

कंबरेच्या आजूबाजूला चरबी होण्याला बेली फॅट म्हटलं जातं. डॉक्टर्सही सांगतात की, पोटावर चरबी वाढल्याने वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. स्ट्रोक आणि हृदय रोगाचा धोकाही अधिक असतो. त्यासोबतच पोटावर चरबी वाढल्याने शरीरात अनेक बदलही होतात. जसे की, मेटाबॉलिक रेट कमी होतो. कोर्टिसोल हार्मोनची निर्मिती वाढते. आणि हे कोर्टिसोल हार्मोन स्ट्रेस वाढवण्याचं काम करतात.

तसेच पोटावर चरबी अधिक असल्याने सायटोकिनचं प्रमाणही वाढतं, ज्याने शरीरातील इन्फ्लेमेटरीचं प्रमाण वाढतं. यामुळेच शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण वाढतं आणि डायबिटीसचा धोका अनेक पटीने वाढतो. म्हणजे सर्व गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत.

कोणत्या आजारांचा धोका?

पोट आणि कंबरेवर चरबी वाढल्याने वेगवेगळ्या आजारांचा धोका असतो. त्यात प्रामुख्याने हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, कोलेस्ट्रॉलची समस्या, हार्ट स्ट्रोक, डिमेंशिया, किडनीची समस्या आणि कॅन्सरचाही धोका वाढतो.

दही खाण्याचे फायदे

दही हे एक प्रोबायोटिक आहे. आतड्यांमध्ये हेल्दी बॅक्टेरिया वाढवण्यासाठी दह्याचं सेवन फायदेशीर ठरतं. त्यामुळेच दह्याचं सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होतो आणि पचनक्रियाही सुधारते. असं असलं तरी दह्यात फॅटचं प्रमाण कमी असलं पाहिजे, याची काळजी घ्यावी.

Web Title: How curd help to reduce belly fat, you should know it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.