कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवल्यामुळे 'या' गंभीर आजाराचा धोका होतो कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 04:40 PM2018-12-11T16:40:43+5:302018-12-11T16:41:01+5:30
सध्याच्या बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आपल्याला पौष्टीक आहार घेणं शक्य होतच नाही पण त्याचबरोबर व्यायामाकडेही लक्ष देणं अशक्य होतं.
सध्याच्या बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आपल्याला पौष्टीक आहार घेणं शक्य होतच नाही पण त्याचबरोबर व्यायामाकडेही लक्ष देणं अशक्य होतं. आपल्या आहाराकडेही विशेष लक्ष न देता अनेकदा जंक फूडचा आधार घेतो. त्यामुळे अनेकदा विविध आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीचा थेट संबंध आपल्या हृदयाशी असतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉलशी निगडीत कोणतीही समस्या उद्भवल्यास हृदयाच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं ठरतं. जर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं असतं. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवल्यामुळे अल्जायमर सारखे गंभीर आजार होण्याचा धोका कमी असतो.
संशोधकांनी स्मरणशक्ती गमावणं आणि हृदय रोगांमध्ये आनुवांशिक संबंध असल्याचा शोध लावला आहे. संशोधनातून 15 लाख लोकांच्या डीएनएची तपसणी केल्यानंतर असं सिद्ध झालं की, हृदय रोग होणं म्हणजेच ट्रायग्लिसराइड म्हणजेच कोलेस्ट्रॉलची पातळी (एचडीएल, एलडीएल आणि कुल कोलेस्ट्राल) वाढल्यामुळे अल्जायमर होण्याचा धोका असतो. हा शोध एक्टा न्यूरोपॅथॉलॉजिकामध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
दरम्यान, शरीरातील असे जीन्स जे बॉडी इंडेक्स आणि टाइप-2 डायबिटीजचा धोका वाढवितात. त्याचा संबंध अल्जायमरचा धोका वाढण्यासाठी परिणामकारक नसल्याचे आढळून आले.
वॉशिंग्टन यूनिर्वसिटीतील स्कूल ऑफ मेडिसिनचे सहाय्यक प्रोफेसर सेलेस्टे एम. कार्च यांनी सांगितले की, 'जे जीन्स लिपिड मेटाबॉलिज्मला प्रभावित करतात, त्यांचा संबंध अल्जायमर रोग वाढविण्यासाठी परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे.'
स्कूल ऑफ मेडिसिनचे सहाय्यक प्रोफेसर राहुल एस. देसिकन यांनी सांगितले की, या प्रकारचे योग्य जीन्स आणि प्रोटीन्स यांच्यावर लक्ष केंद्रित केलं तर कोलेस्ट्रॉल म्हणजेच ट्रायग्लिसराइड नियंत्रित ठेवण्यासाठी काही लोकांमध्ये अल्जायमरचा धोका कमी करता येतो. संशोधनातून असं सिद्ध झालं की, डीएनएचा जो अंश हृदय रोगचा धोका वाढवतो. तो अल्जायमर रोगाचा धोका वाढविण्यासाठी जबाबदार ठरतो.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पदार्थ ठरतात फायदेशीर :
- कोलेस्ट्रॉलची समस्या दूर करण्यासाठी आहारात नेहमी ऑलिव्ह ऑइलचा वापर करा, जे आरोग्यासाठी फायदेशीर असेल. जेवण तयार करण्यासाठी जास्त तेलाचा वापर करू नका. खराब कोलोस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करा.
- डॉक्टर अनेकदा दररोज 20 ते 35 ग्रॅम फायबर घेण्याचा सल्ला देतात. जर तुम्हाला एलडीएल कोलेस्ट्रॉल घटवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आहारातून कमीतकमी 10 ग्रॅम फायबर अवश्य घ्या.
- सोयाबीनपासून तयार करण्यात आलेलं सोया मिल्क, दही किंवा टोफूचं सेवन केल्यामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो. हे पदार्थ एलडीएल कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी लिव्हरची मदत करतात आणि चांगलं कोलेस्ट्रॉल (एचडीएल) वाढवतं.
- बदाम, अक्रोड आणि पिस्त्यामध्ये फायबर आढळून येतं. हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढविण्यासाठी मदत करतं. जेवण केल्यानंतर अक्रोड खाल्याने हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते.