एकदा दात पडल्यानंतर नवीन दात लावणं कितपत गरजेचं? जाणून घ्या डेंटिस्ट्सचा सल्ला
By Manali.bagul | Published: November 6, 2020 05:02 PM2020-11-06T17:02:18+5:302020-11-06T17:09:18+5:30
Oral Health care Tips in Marathi : दात पडलेले असतील तर कृत्रिम दात लावल्यामुळे चारचौघात असतानाही चिंतेचं काही कारण नसतं. दात तुटल्यामुळे बोलायलाही त्रास होतो.
विशिष्ट वयानंतर दातांशी निगडीत समस्यांचा सामना प्रत्येकालाच कारावा लागतो. तोंडाच्या आरोग्यासाठी दात खूप महत्वाचे आहेत. जर एखाद्या व्यक्तीचे दात पडले तर त्याला चावण्यासाठी तसंच बोलण्यात त्रास होतो. म्हणून, दात पडणे वेदनादायक आहे. नवीन कृत्रिम दात लावून तुटलेले, पडलेले दात किंवा दाढ बदलता येतात. दात बदलणे ही एक कला आहे, ज्यामध्ये कृत्रिम दात तुटलेल्या दाताच्या जागी लावले जातात. याला दंत कृत्रिम (डेंटल प्रोस्थेसिस) अवयव म्हणतात. कृत्रिम दात किंवा आर्टिफिशियल डेंचर लावणं किती गरजेचं असतं. याबाबत डेंटिस्ट डॉ. आनंद राज यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना माहिती दिली आहे.
दात तुटल्यानंतर दुसरे दात लावणं का गरजेचं असतं
तोंडात दात असल्यास आत्मविश्वास मिळतो. दात पडलेले असतील तर कृत्रिम दात लावल्यामुळे चारचौघात असतानाही चिंतेचं काही कारण नसतं. दात तुटल्यामुळे बोलायलाही त्रास होतो. जेव्हा दात तुटतात तेव्हा जबडाच्या ज्या भागावर दात असतात, त्याचा आकार कमी होतो. कृत्रिम दंत रोपण केल्यास हाडं चांगली ठेवण्यास आणि आपल्या जबड्याचा आकार राखण्यास मदत करते.
दात तुटण्यामुळे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ चघळण्याची आणि खाण्याची तुमची क्षमता बदलते. व्यवस्थित खाता येत नाही याचा शरीरावर आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. दात तुटल्यामुळे मोकळी जागा निर्माण होते. ज्यामुळे दातदुखीची समस्या अधिक वाढत जाते. जर एखाद्या व्यक्तीचे दात पडले असतील तर डेंचर वापरणे योग्य आहे. वास्तविक डेंचर म्हणजे बनावट दातांचा एक समूह, जो जबड्यात बसविला जातो. बहुतेक लोक दात बदलणे पसंत करतात. भारतात ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ७ पैकी एका व्यक्तीला या समस्येचा सामना करावा लागतो.
डोळ्यांच्या कॉर्नियावरही होऊ शकतो कोरोना व्हायरसचा परिणाम?; नव्या संशोधनातून खुलासा
Complete डेंचर्स हे प्लास्टिक बेसपासून बनविलेले असतात, जे हिरड्यांच्या रंगाचे असते आणि त्यात प्लास्टिक किंवा पोर्सिलेनचा वापर केला जातो. Partial Denture प्लास्टिक बेस किंवा फ्रेमवर्कपासून बनलेले आवरण असते, त्यामुळे दातांना सपोर्ट मिळतो.
कोरोना संसर्गानंतर सर्वाधिक लोकांना उद्भवतोय 'हा' आजार; आरोग्यमंत्रालयाने दिल्या गाईडलाईन्स
दात आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य आणि हसण्यात महत्वाची भूमिका बजावत असतात. दात पडल्यानंतर डेंचरमुळे आपण आपले सौंदर्य पुन्हा मिळवू शकता. त्यामुळे घास चावण्याची प्रक्रिया वेगाने करू शकता. डेंटल प्लाक कमी झाल्याने डेंचर वापरत असलेल्या लोकाच्या ओरल हेल्थमध्ये सुधारणा होते. दंत रोपण (रिप्लेसमेंट) तेव्हा यशस्वी ठरते जेव्हा रुग्ण हा वेगवेगळ्या पद्धतीने दातांच्या स्वच्छतेची काळजी घेतो.