लॉकडाऊनमध्ये लठ्ठपणाचे शिकार होण्यापेक्षा मेंटेन राहण्यासाठी रोज 'या' गोष्टींकडे लक्ष द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 01:49 PM2020-05-07T13:49:35+5:302020-05-07T13:59:24+5:30
घरबसल्या या उपायांचा वापर करून तुम्ही आपलं वाढतं वजन नियंत्रणात आणू शकता.
(image credit- wisegeek)
वाढत्या वजनाची समस्या सगळ्यांनाच उद्भवत असते. वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण व्यायाम करण्यापासून डाएट करण्यापर्यंत वेगवेगळे उपाय करत असताे. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे वजन वाढण्याची समस्या सर्वाधिक लोकांना उद्भवताना दिसून येत आहे. जेवणाच्या आणि झोपेच्या वेळा निश्चित नसणं यांमुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स वाढतात. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तुम्ही आपलं वाढतं वजन नियंत्रणात आणू शकता.
जास्तीत जास्त पाणी प्या
इतर ऋतूंपेक्षा तुलनेने उन्हाळ्यात शरीराला पाण्याची खूप गरज असते. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीर डिहायड्रेट होतं. जास्त पाणी प्यायल्यामुळे त्वचा चांगली राहते. दिवसभरातून आठ ते दहा ग्लास पाणी प्या. त्यामुळे पोटावरची चरबी कमी करता येते. अतिरिक्त फॅट्स बर्न करण्यासाठी पाणी पिणं फायदेशीर ठरेल.
थोड्या थोड्या वेळाने खा
वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. जेव्हाही तुम्हाला भूक लागेल तेव्हा एकाचवेळी जास्त न खाता थोड्या थोड्या वेळाने खात राहा. जर तुमचे वजन कमी होत नसेल तर तुमच्या झोपेच्या वेळा चुकीच्या असू शकतात.जर तुम्ही सकाळी उशीरा उठत असाल तर, वजन कमी होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सकाळी लवकर उठायला हवं.
जास्त गोड खाऊ नका
लॉकडाऊनमध्ये घरी असल्यामुळे उर्जेचा वापर फारसा केला जात नाही. म्हणून जास्त कॅलरीज असलेले गोड पदार्थ खाणं टाळा. काहीजण गोड पदार्थ आवडतात. म्हणून प्रमाणाचा काहीच विचार न करता नेहमीच आणि खूप प्रमाणात खातात. परंतु गोड पदार्थ पौष्टिक असले तरी, पचायला जड असतात आणि पचनशक्तीवर विशेष ताण देणारे असतात. त्यामुळे गोड पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ले तरच उपयोगी पडतात अन्यथा नुकसान देतात. प्रमाणाबाहेर गोड पदार्थ खाल्ल्यानं वजन खूप वाढतं. शरीरात अवास्तव प्रमाणात मेद किंवा चरबी निर्माण होते. लवकर थकवा येणं, अतिप्रमाणात घाम येणं, मेदाचे इतर आजार जसे की मधुमेह, विविध प्रकारच्या गाठी निर्माण होण्याची शक्यता वाढते. (हे पण वाचा-आंबट आहे की गोड कसं ओळखाल? आंबे खरेदी करण्याआधी 'ही' ट्रीक माहीत करून घ्या)
व्यायाम करा
लॉकडाऊनमध्ये स्वत: ला वजन कमी करण्याासाठी चॅलेंज द्या. कारण व्यायाम केल्यानंतर पुरेशी झोप घेणं सुद्धा आवश्यक असतं. लॉकडाऊनमुळे तुम्ही शरीराला आराम सद्धा देऊ शकता. सकाळी लवकर उठून गरम पाणी प्या. आणि नाश्ता करताना शरीरास पौष्टिक असणारे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. आणि व्यायाम न चुकता दररोज करा. रोज स्वतःसाठी २० ते ३० मिनिटं वेळ देऊन तुम्ही शरीर निरोगी ठेवू शकता. ( हे पण वाचा-किडन्यांमध्ये पाण्याने भरलेले फोड येणं; असू शकतो 'या' आजाराचा धोका, जाणून घ्या लक्षणं)