तुमची फप्फुसं कमजोर आहेत की मजबूत कसं कळेल? तज्ज्ञांनी सांगितली 'ही' लक्षणे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 05:48 PM2021-07-13T17:48:48+5:302021-07-13T17:49:19+5:30
कोरोना महामारीच्या प्रकोपात फुफ्फुसांच्या आरोग्याकडे विशेष भर दिला जात आहे. अशावेळी तुमची फुफ्फुसे निरोगी आहेत हे कसे ओळखाल...
कोरोना महामारीच्या प्रकोपात फुफ्फुसांच्या आरोग्याकडे विशेष भर दिला जात आहे. अशावेळी तुमची फुफ्फुसे निरोगी आहेत हे कसे ओळखाल. यासाठी डॉ. रंजना सिंह यांनी झी न्युज हिंदीच्या वेबसाईटला काही लक्षणे सांगितली आहेत. या लक्षणांवरून तुम्ही ओळखु शकता की तुमच्या फुफ्फुसाचे आरोग्य कसे आहे?
कफ किंवा खोकला
खरं तर खोकणे म्हणजे कफिंग ही आपल्या शरीराद्वारे केली जाणारी एक संरक्षक क्रिया आहे. विषारी द्रव्य अथवा एखादी वस्तू श्वासावाटे आत खेचली गेली तर ती बाहेर फेकण्यासाठी खोकला येतो. अशा रातीनं खोकला चांगला (प्रॉडक्टिव) किंवा वाईट (अनप्रॉडक्टिव) असू शकतो - चांगल्या खोकल्यानं हवेचा मार्ग स्वच्छ करण्याचं काम केले जाते. मात्र सततचा किंवा वाढता खोकला, ताप चढणे, धाप लागणे किंवा कफातून रक्त पडणे अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हे उत्तम. फुफ्फुसांच्या आजाराचं सर्वसामान्य लक्षण म्हणजे खोकला.
श्वास फुलणे
श्वास घेताना किंवा सोडताना फुलु शकतो. ह्याचं कारण म्हणजे श्वसनमार्ग अरुंद बनणे, त्यांमध्ये उतींची अनावश्यक वाढ होणे, त्यांची जळजळ होणे, एखादी वस्तू श्वासावाटे आत खेचली जाणे. ह्या लक्षणानं फुफ्फुसांची एकंदर ढासळती स्थितीदेखील दाखवली जाते.
छातीत दुखणे
फुफ्फुसं, फुफ्फुसावरणाची जळजळ किंवा छातीच्या पिंजर्यामधील स्नायू तसंच हाडांच्या समस्यांमुळे छातीत दुखू शकते. हे दुखणे गंभीरही असू शकते. कधीकधी जिवावर बेतणारं देखील. छातीत सतत दुखू शकते किंवा फक्त श्वास घेताना. खोकला किंवा ताप येऊन छातीत दुखत असेल तर मात्र जंतुसंसर्गाची शक्यता असू शकते. छातीत दुखत असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा.
फुफ्फुसांचे आरोग्य कसे उत्तम राखाल
धूम्रपानामुळं आपल्या शरीरावर भयानक परिणाम होतात. सिगरेट किंवा बिडी ओढल्यानं फक्त फुफ्फुसांचे आजारच होतात असं नाही तर एंफिसेमा, सीओपीडी आणि फुफ्फुसांचा कर्करोग होण्यचीही शक्यता असते. शरीराच्या इतर अनेक अवयवांवर आणि त्यांच्या कामावरदेखील धूम्रपानाचे वाईट परिणाम होतात.
फुफ्फुसांच्या आजारांमुळे तुम्ही त्रस्त असाल तर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणं टाळा. दुग्धजन्य पदार्थ म्हणजे उदा. ताक, दही, श्रीखंड आदी. या पदार्थांचे सेवन टाळा.
फुफ्फुसांच्या स्वास्थासाठी हायड्रेट असणं गरजेचं आहे. त्यामुळे दिवसातून ८ ते १० ग्लास पाणी प्यायल्यामुळे फुफ्फुसांशी निगडीत आजार कमी होऊ शकतात. त्याचबरोबरीने चहा तसेच गरम पाणी प्यायल्यामुळे श्वास घेण्यास निर्माण होणारा अडथळा देखील कमी होऊ शकतो. तसेच वायुमार्ग देखील साफ होण्यास मदत मिळते.