शेंगदाण्यांच्या मदतीने कमी होतं वजन? कसं ते जाणून घ्या....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 01:26 PM2019-10-04T13:26:03+5:302019-10-04T13:26:47+5:30
शेंगदाण्यांचा वापर आपण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. खासकरून हिवाळ्यात तर शेंगदाणे मोठ्या आवडीने खाल्ले जातात.
शेंगदाण्यांचा वापर आपण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. खासकरून हिवाळ्यात तर शेंगदाणे मोठ्या आवडीने खाल्ले जातात. कारण यात प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं आणि तसेच या वेगवेगळ्या प्रकारचे पोषक तत्वही असतात. त्यामुळेच शेंगदाण वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
वाढणारं वजन ही अलिकडे मोठी समस्या होत चालली आहे. वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय करूनही काहीच अनेकांना काहीच फायदा होतांना दिसत नाही. अशात या हिवाळ्यात तुम्ही शेंगदाणे खाऊन वजन कमी करू शकता. चला जाणून घेऊ शेंगदाण्यांची वजन कमी करण्यासाठी कशी होते मदत...
मेटाबॉलिज्म चांगलं राहण्यास मदत
आपल्या निरोगी आणि फिट जीवनासाठी मेटाबॉलिज्म मजबूत असणं फार गरजेचं आहे. ज्या लोकांचं मेटाबॉलिज्म योग्यप्रकारे काम करतं, ते लोक निरोगी राहतात. असे लोक अनेक गंभीर आजारांपासूनही बचाव करू शकतात. मेटाबॉलिज्म योग्य राहिल्याने शरीरातील अवयवांमध्ये कार्बोहायड्रेट जमा होत नाही. कार्बोहायड्रेट किंवा फॅट जमा झाल्यानेच आपलं वजन वाढू लागतं. शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या शरीराचं मेटाबॉलिज्म चांगलं राहतं.
कार्बोहायड्रेटचं प्रमाण होतं कमी
शेंगदाणे कार्बोहायड्रेटचं सर्वात चांगला स्त्रोत आहे. शेंगदाणे खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं आणि भूकही लागत नाही. अशात जर तुम्ही शेंगदाण्याचं सेवन कराल तर तुमचं पोट भरलेलं राहणार आणि तुम्ही कोणतेही कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खाणार नाही. याने तुमचं वजन नियंत्रणात राहील.
पोषक तत्व
शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. तसेच शेंगदाण्यांमध्ये बायोटिन, तांबं, पोटॅशिअम, फोलेट, नियासिन, थियामिन आणि व्हिटॅमिन ई सारखे पोषक तत्वही असतात. हे तत्व शरीरात आढळणाऱ्या मोनोअनसॅच्युरेटेड फॅट कमी करण्यास मदत करतात. केवळ इतकंच नाही तर या पोषक तत्वाने कॅलरी बर्न होण्यासही मदत मिळते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी शेंगदाणे फायदेशीर ठरतात.
इन्सॉल्यूबल डाएट्री फायबर
शेंगदाण्यांमध्ये लो इन्सॉल्यूबल डाएट्री फायबरही भरपूर प्रमाणात असतं. जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतं. त्यामुळे वाढतं वजन कमी करण्यासाठी शेंगदाण्याचं सेवन करावं. तुम्ही शेंगदाण्यात कांदा आणि टोमॅटो टाकूनही खाऊ शकता.